

State Excise Cracks Down on Spurious Liquor Racket, ₹33 Lakh Haul Recovered
Sakal
पातूर/ अकोला: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत अकोला जिल्ह्यात बनवाट देशी दारू निर्मिती करणारा मोठा कारखाना उध्वस्त करण्यात आला. या कारवाईत ‘रॉकेट देशी दारू - संत्रा’ या ब्रँडच्या एकूण ६५० बॉक्समध्ये भरलेल्या अंदाजे ६५ हजार सिलबंद बाटल्या तसेच अन्य साहित्य असा एकूण ३२ लाख ३४ हजार ४९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नववर्ष आणि आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्यनिर्मितीविरोधातील मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली.