Akola Crime
sakal
अकोला - शहरातील खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या खडकी परिसरात सुरू असलेल्या देहव्यवसायावर पोलिसांनी अचूक सापळा रचत छापा टाकला. रहिवासी अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमध्ये हा प्रकार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. छाप्यात तीन महिलांसह एका पुरुष ग्राहकाला ताब्यात घेण्यात आले असून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.