esakal | बांधकाम मजुराचा दगडाने ठेचून खून; नेहरूपार्क चौकात रात्रीच्या समयी थरार तर आरोपी फरार
sakal

बोलून बातमी शोधा

A man was killed in the Nehru Park Chowk area of ​​Akola on Saturday night

शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असून, कोरोना संकट काळातही गुन्हेगारी पोलिसांकरिता डोकेदुखी ठरली आहे. शनिवारी रात्री खदान पोलिस ठाणे अंतर्गत येणाऱ्या नेहरू पार्क चौकात एका ३५ वर्षीय इसमाची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली.

बांधकाम मजुराचा दगडाने ठेचून खून; नेहरूपार्क चौकात रात्रीच्या समयी थरार तर आरोपी फरार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : खदान पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नेहरू पार्क चौक परिसरात शनिवारी रात्री दगडाने ठेचून एका इसमाची हत्या करण्यात आली असल्याची घटना उशिरा रात्री उघडकीस आली. या घटनेतील आरोपी सुमितकुमार राजेशकुमार शर्मा यास पोलिसांनी शोधून काढले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
 
शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असून, कोरोना संकट काळातही गुन्हेगारी पोलिसांकरिता डोकेदुखी ठरली आहे. शनिवारी रात्री खदान पोलिस ठाणे अंतर्गत येणाऱ्या नेहरू पार्क चौकात एका ३५ वर्षीय इसमाची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार इसमाचे नाव श्याम शंकर घोडे असून, तो गवंडीकाम करत होता. खदान परिसरातील सरकारी गोडावून मागे त्याचे घर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणातील आरोपी फरार असून, खदान पोलिस शोध घेत आहेत. घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केली असता, तेथे चिलम व छापे आढळून आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रथमदर्शनी ही हत्या व्यसनातून करण्यात आली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

अकोल्याच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

सात तासात आरोपीला अटक
 
नेहरू पार्क परिसरात शनिवारच्या मध्यरात्रीनंतर श्याम शंकर घोडे याचा खून करण्यात आला होता. अकोला पोलिसांनी अवघ्या सात तासाच्या आत आरोपीला शोधून काढले. आरोपी सुमितकुमार राजेशकुमार शर्मा असे मारेकऱ्याचं नाव असून, तो उत्तर प्रदेशातील रामपूर येथील रहिवासी आहे. किरकोळ कारणांवरून हत्या करण्यात आली असल्याचं समोर आलं आहे. 

संचारबंदी असताना झाला खून
 
अकोला महानगरपालिका क्षेत्रात कोरोना संसर्ग वाढत असल्याने रात्रीची संचारबंदी लागू आहे. असे असतानाही भर चौकात मध्य रात्री एका बांधकाम मजुराचा खून झाला. त्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रात्रीची गस्त वाढविण्याची गरज असल्याचेही या निमित्ताने स्पष्ट झाले आहे

loading image