Manipur Incident
Manipur Incidentsakal

Manipur Incident : मणिपूर घटनेचा ख्रिस्ती समाजाने नोंदविला निषेध!

जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पंतप्रधानांना पाठविले निवेदन

अकोला : मणिपूर येथे ख्रिस्ती बांधवांवर होत असलेल्या अन्याय, अत्याचाराविरोधात जिल्ह्यातील ख्रिस्ती बांधवांनी जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. मणिपूर येथे गत अनेक दिवसांपासून विविध ठिकाणी चर्चेस जाळून ख्रिश्चन समाजातील व्यक्ती आणि महिलांचा अमानुष छळ करण्यात येत आहे. हा प्रकार संवैधानिक नसून, मानवजातीला काळिमा फासणारा आहे.

अशा प्रकारच्या घटना भविष्यात निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासकीय स्तरावर योग्य ती कारवाई करावी आणि संबंधितांना योग्य ती दंडात्मक शिक्षा होणे अपेक्षित असून, भविष्यात असे समाजविरोधक कार्य होणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे.akola

Manipur Incident
Akola : नदीत बुडाल्याने युवकाचा मृत्यू

असे नमूद करीत अकोला ख्रिस्ती समाजाने जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक निवेदन सादर करीत मणिपूरमधील अन्याय आणि अत्याचाराच्या घटनांचा निषेध व्यक्त केला. दरम्यान मणिपूरसह भारत देशात सर्वत्र शांतता प्रस्थाापित व्हावी, यासाठी अकोला शहरामध्ये सर्वत्र ख्रिस्ती बंधू-भगिनी प्रार्थना करीत असून,

शांततेच्या मार्गाने आम्ही मणिपूरच्या घटनेचा निषेध करीत आहोत, असेही जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तत्पूर्वी अलायन्स कॉन्फरन्स सेंटर चर्चमध्ये यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

Manipur Incident
Akola News : आयडॉलमधून विद्यार्थ्यांच्या गायन प्रतिभेस चालना!

यावेळी समस्त ख्रिस्ती समाज समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष जोसेफ बाबर, अलायन्स मिनीस्ट्रीज मुंबईचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर रेव्ह. राजेश पटोडे, डॉ. प्रमोद डी. इंगळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी अनुप डेव्हीडसन, रेव्ह. डी.ए. गायकवाड, सुशील डेव्हीडसन, रेव्ह. राहुल हिवराळे, जॉय भिसे, देवानंद साळवे,

संतोष प्रताप, निलेश ससाणे, दीपक शेजे, तुषार मडामे, रेव्ह. विनोद हातोले, रेव्ह. प्रभुदास सावळे, अशोक डोंगरदिवे, स्वरूप घाटगे, रेव्ह. मोजेस वानखडे, सुनील डेव्हीडसन, रुबेन इंगळे, रेव्ह. दिलीप सरदार, रेव्ह. उनील लोणारे, अक्षय प्रधान, जस्टीन मेश्रामकर, अनिल अघमकर, अरविंद बिरपॉल, अमित ठाकूर यांची उपस्थिती होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com