
देऊळगाव राजा : मातंग समाज हा वंचित दुर्बल घटकात जिवन जगत आला आहे. समाजातील विद्यार्थ्यांना आपल्यातील शैक्षणिक गुणवत्ते द्वारे उच्च शिक्षणातून संधीचं सोनं केले पाहिजे.याच बरोबर उपवर्गीकरणासह मातंग समाजाचे प्रलंबित प्रश्न येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात प्रामुख्याने मांडू असे आश्वासन आमदार मनोज कायंदे दिले.