esakal | घरकुलापासून लाभार्थी वंचितच ; गरजू कुटुंबीयांची पावसाळ्यात होते तारांबळ

बोलून बातमी शोधा

Many beneficiaries have been deprived of gharkula at Shirpur Jain}

प्रधानमंत्री आवास योजना ही राबविली जात असतांना अनेक गरजू लाभार्थी कुटुंब त्याकडे मोठ्या आशेने पाहत आहेत. या योजनेत सहभागी होण्याकरिता कित्येक कुटुंब अशिक्षित असल्याकारणाने कागदपत्राच्या कचाट्यात अडकलेलेच आहेत.

घरकुलापासून लाभार्थी वंचितच ; गरजू कुटुंबीयांची पावसाळ्यात होते तारांबळ
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शिरपूर जैन (वाशीम) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत प्रत्येक गरजू कुटुंबाला मोफत घरकूल देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अजूनही अत्यावश्यक गरजूचे नाव घरकुल योजनेमध्ये नसल्याने ते आपले नाव घरकुलांच्या यादीत मोठ्या आशेने शोधत आहेत. अजूनही घरकुलाच्या यादीत नसल्याने पावसाळ्यात मात्र अशा कुटुंबाची व्यवस्थे अभावी मोठी तारांबळ उडते. 

अकोल्याच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

प्रधानमंत्री आवास योजना ही राबविली जात असतांना अनेक गरजू लाभार्थी कुटुंब त्याकडे मोठ्या आशेने पाहत आहेत. या योजनेत सहभागी होण्याकरिता कित्येक कुटुंब अशिक्षित असल्याकारणाने कागदपत्राच्या कचाट्यात अडकलेलेच आहेत. घरकुलासाठी गरीब गरजू कुटुंब, विधवा महिला, निराधार, वृद्ध व्यक्ती,अपंग व्यक्ती यांच्यासाठी या योजनेची सुरुवात १९८५-८६ या सालात झाली.

या योजनेचे पुनर्गठन १९९९-२०० मध्ये करण्यात आले. २०१६ साली या योजनेचे इंदिरा गांधी आवास योजना हे नाव बदलून प्रधानमंत्री आवास योजना करण्यात आले. गरीब व गरजू कुटुंबांना मोफत घरकुल मिळण्यासाठी ही योजना राबविण्यात आली आहे. त्याचबरोबर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती  प्रवर्गातील गरीब कुटुंबाकरता रमाई आवास योजना त्याच बरोबर शबरी आवास योजना व आदिवासी पारधी आवास योजना सुद्धा आहे. 

सिलेंडरच्या किंमती भडकल्याने गावात पेटल्या चुली; ग्रामीण भागात पुन्हा जैसे थे स्थिती

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत प्रत्येक गरजू लाभार्थी व्यक्तीला, कुटुंबाला मोफत घरकुल देण्याचे आश्वासन सुद्धा दिलेले आहे. पण या घरकुल योजनेचा लाभ अनेक गरजू कुटुंबाला अद्याप मिळालेला नाही. याकडे संबंधिताने लक्ष देणे गरजेचे आहे. गरीब व्यक्ती, निराधार, वृद्ध, महिला, अपंग हे या घरकुल यादीमध्ये आपल्या नावाची प्रतीक्षा करताना दिसतात. तसेच लाभार्थी गरजू कुटुंब यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्याकडे मोठ्या आशा लावून बसले आहेत.