esakal | सिलेंडरच्या किंमती भडकल्याने गावात पेटल्या चुली; ग्रामीण भागात पुन्हा जैसे थे स्थिती

बोलून बातमी शोधा

Due to increase in cylinder prices, women in Shirpur have started cooking on stoves.jpg}

सिलेंडरची दर आठवड्याला वाढती किंमत सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री देणारी ठरत असून नागरिकांचे महिन्याचे आर्थिक बजेट कोलमडत आहे. विशेष करून ग्रामीण भागातील महिलांनी गॅसकडे पाठ फिरवली असल्याचे दिसून येते.

सिलेंडरच्या किंमती भडकल्याने गावात पेटल्या चुली; ग्रामीण भागात पुन्हा जैसे थे स्थिती
sakal_logo
By
संतोष गिरडे

शिरपूर (वाशीम) : उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसह सर्व प्रकारच्या स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरची किंमत वाढविण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यातील आताची तिसरी दरवाढ असून या महिन्यात सिलेंडर चक्क १०० रुपयांनी महागले आहे. महाग झालेल्या गॅस सिलेंडरच्या भडक्याने सर्वसामान्यांची होरपळ सुरू असून ग्रामीण भागात विझलेल्या चुली आता पुन्हा भेटू लागल्या आहेत.

अकोल्याच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

केंद्र सरकारने ग्रामीण भागातील महिलांच्या सन्मानासाठी २०१६ साली प्रधानमंत्री उज्वला योजना सुरु केली होती. यामध्ये १०० रुपयांच्या अल्पशा रकमेत महिलांच्या नावे गॅस कनेक्शन मिळत होते. शंभर रुपयाच्या किंमतीत गॅस सिलेंडर व शेगडी मिळत असल्याने शहरासह ग्रामीण भागात महिलांचा या योजनेला उत्फुर्त प्रतिसाद मिळाला. परंतु काही वर्षातच केंद्र सरकारने गॅस सिलेंडरचे दर वाढवून महिलांवर पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आणली आहे.

दहशतवादविरोधी पथकाचा दहिहांडा येथे अवैध गुटखा विक्रीवर छापा

"स्वच्छ इंधन, उत्तम जीवन" या घोषणेसह केंद्र सरकारने १ मे २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात "प्रधानमंत्री उज्वला योजना"मोठ्या उत्साहात सुरू केली. धूर मुक्त ग्रामीण भारत अशी यामागची संकल्पना आहे. २०१९ पर्यंत पाच कोटी कुटुंबियांना विशेषतः दारिद्र रेषेखालील महिलांना सवलतीच्या दरात एलपीजी कनेक्शन प्रदान करण्याचे उद्दिष्ट पूर्ण केले. या योजनेमुळे एलपीजीचा वापर वाढेल, ग्रामीण भागातील महिलांना गॅस वापरण्याची सवय लागेल आणि आरोग्याशी संबंधित विकार, वायू प्रदूषण व जंगलतोड कमी करण्यास मदत होईल, असा विचार सरकारचा होता.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

गत महिन्यापासून अनुदानित व विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या किंमतीत सतत वाढ होत आहे. त्यामुळे दर महिन्याला लागत असलेले सिलेंडर आता ग्रामीण भागातील महिलांना परवडणारे नसल्याने त्यांनी पुन्हा आपला मोर्चा परंपरागत चुलीकडे वळवला आहे. सिलेंडरची दर आठवड्याला वाढती किंमत सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री देणारी ठरत असून नागरिकांचे महिन्याचे आर्थिक बजेट कोलमडत आहे. विशेष करून ग्रामीण भागातील महिलांनी गॅसकडे पाठ फिरवली असल्याचे दिसून येते.

स्वयंपाक घरात दैनंदिन लागणाऱ्या गॅस सिलेंडरच्या किंमतीत फेब्रुवारी महिन्यात जवळपास शंभर रुपयांनी वाढ झाल्याने आता ते आठशे रुपयाच्या वर मिळत आहे. वर्षाला बारा सिलेंडरवर अनुदान मिळत असे कधी काळी १५० ते २०० रुपयापर्यंत मिळणारे अनुदान काही महिन्यापासून कोणताही गाजावाजा न करता हळूहळू कमी झाले आहे. आता ग्राहकांच्या बँक खात्यात अवघे एक ते चार रुपयापर्यंत अनुदान जमा होत असल्याचे निदर्शनास येते. गॅस सिलेंडरच्या वाढत्या किंमती व अनुदानावर झालेल्या कपातीमुळे ग्राहकांमधून मोठी नाराजी व्यक्त केल्या जात आहे.