Senior Maoist Leader Bandi Prakash Surrenders
esakal
गडचिरोली : छत्तीसगड आणि महाराष्ट्रात वरिष्ठ माओवादी नेत्यांसह मोठ्या संख्येने वरिष्ठ कॅडरच्या शरणागतीची मालिका सुरू असतानाच हे लोण आता तेलंगणातही पोहोचले असून गेली ४५ वर्षे माओवादी चळवळीत सक्रिय असलेला वरिष्ठ माओवादी नेता आणि तेलंगणा राज्य समिती सदस्य बंडी प्रकाश ऊर्फ प्रभात (Senior Maoist Leader Bandi Prakash) याने मंगळवार (ता. २८) तेलंगणा पोलिसांसमोर शरणागती पत्करली. त्याने तेलंगणचे पोलिस महासंचालक बी. शिवधर रेड्डी यांच्यासमोर शरणागती पत्करली आहे. त्याच्यावर विविध राज्यांत मिळून दीड कोटींचे बक्षीस होते.