मुला-मुलींच्या विवाहासाठी होतोय विलंब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola

मुला-मुलींच्या विवाहासाठी होतोय विलंब

अकोला : दिवसेंदिवस मुला-मुलींच्या विवाहाकरिता विलंबाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे विवाहासाठी मुलींचे वय वाढत असून, अनेक समस्या निर्माण होत आहेत. यासाठी दोन्ही गटातील वाढत्या अपेक्षा कारणीभूत असल्याचे दिसत आहे. या समस्येवर उपाय शोधण्याकरिता पाटलील समाजातर्फे महिलांचा एक भव्य असा ‘जागर मेळावा’ घेण्यात येणार आहे.

पाटील समाज महिला आघाडीने पुढाकार घेत या मेळाव्याचे नियोजन केले आहे. महिला आघाडीच्या अध्यक्षा ज्योत्स्ना चोरे, उपाध्यक्ष सुषमा निचळ, मीनाक्षी डिवरे, सचिव सुनिता मेटांगे, सदस्या प्रतिभा खाडे, मंगळा म्हैसने, दिपाली बेंडे, मोनिका वाघ, नयना मनतकार, माधुरी क्षीरसागर, प्रतिभा अंधारे, सुमन गावंडे, मेघा दोड, वैष्णवी निचळ, सिंधू पाटील, सुनिता ताथोड, दिपाली गावंडे यांनी मेळावच्या नियोजनाची तयारी सुरू केली आहे. पाटील समाजाचे अध्यक्ष अशोकराव अमानकर यांच्या अध्यक्षतेखाली जानोरकर मंगल कार्यालयात संपन्न झालेल्या सभेत महिला जागर मेळाव्याचा निर्णय घेण्यात आला. सभेत अशोकराव अमानकर, विनायकराव शेळके, रघुनाथ खडसे, दिनकरराव सरप, राजेंद्र मोहोकार, प्रदीप खाडे आदींसह बहुसंख्य सदस्य उपस्थित होते.

नोव्हेंबरमध्ये परिचय मेळावा

पाटील समाजातील उपवर-वधूंचा परिचय मेळावा ता. १३ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याची रुपरेषाही सभेत ठरविण्यात आली. मेळाव्याच्या निमित्ताने ‘योगायोग’ही पुस्तिका प्रकाशित केली जाणार आहे. त्यासाठी उपवर-वधूंचे फोटो पालकांनी माहितीसह अकोला शहरातील जानोरकर मंगल कार्यालय, कौलखेड, न्यू अनंत मेडिकल रतनलाल प्लॉट, गजानन डिवरे डाबकी रोड, ज्ञानदेव वनारे व गजानन पुंडकर मोठी उमरी यांच्याकडे जमा करण्याचे आवाहन पाटील समाज संघटनेत्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Web Title: Marriage Of Boys And Girls Delay

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..