लसीकरणाबाबत एनएसएस समन्वयकांची बैठक 2 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अकोला : लसीकरणाबाबत एनएसएस समन्वयकांची बैठक

अकोला : लसीकरणाबाबत एनएसएस समन्वयकांची बैठक

अकोला : महानगरपालिका क्षेत्रामधून कोरोना आजारामुळे होणा-या मृत्‍यु टाळण्‍यासाठी आणि कोरोना आजारावर संपुर्णपणे आळा घालण्‍याकरिता शहरातील प्रत्‍येक नागरिकांनी कोरोना लस घेणे अत्‍यंत आवश्‍यक आहे. त्यासाठी ता.१६ नोव्‍हेंबर रोजी मनपा उपायुक्‍त डॉ.पंकज जावळे यांनी त्‍यांच्‍या दालनात शहरातील महाविद्यालयातील एन.एस.एस. समन्वयकांची विशेष बैठक घेतली.

या बैठकीमध्‍ये उपायुक्‍त डॉ.जावळे यांनी, कॉल सेंटर करीता प्रत्‍येक कॉलेज मधून विद्यार्थ्‍यांची दोन टीम तयार करण्याबाबत सूचना दिली. कॉलेज परिसरात पथनाट्यव्‍दारे लसीकरणासाठी जनजागृती करणे. शहरातील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थ्‍यांचे पालक व घरातील सर्व सदस्‍यांची लसीकरण करून घेणे. शहरात कमी प्रमाणात लसीकरण झालेल्‍या भागामधील नागरिकांना लस घेणे संदर्भात प्रोत्‍साहित करून लाभार्थ्‍यांना नजीकच्‍या लसीकरण केंद्रावर आणणे.

हेही वाचा: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आजपासून अन्नत्याग सत्याग्रह

विद्यालय परिसरात माझे विद्यार्थ्‍यांचे कुटुंब माझी जबाबदारी अशा आशा आशयाचे फलके लावून जनजागृती करणे. लसीकरणाची टक्‍केवारी कमी असलेल्‍या भागांमध्‍ये विद्यर्थ्‍यांची टीम तयार करून लस घेण्‍यासाठी प्रोत्‍साहित करणे. १०० टक्‍के लसीकरण झालेल्‍या घरांवर हिरव्‍या रंगाची, ७० टक्‍के लसीकरण झालेल्‍या घरांवर केसरी रंगाची आणि लसीकरण न झालेल्‍या घरांवर लाल रंगाची खूण करणे. आदींबाबत सूचना देण्‍यात आली आहे. या बैठकीत मनपा वैद्यकीय आरोग्‍य अधिकारी डॉ.अस्मिता पाठक, सीताबाई कला महाविद्यालयातील प्राचार्य अमोल गावंडे, प्राचार्य हरीश नरेटी, आर.एल.टी.कॉलेज येथील डॉ.रश्‍मी जोशी, आशिष मुठ्ठे, एल.आर.टी.कॉलेज येथील नीलेश चोटिया, शिवाजी महाविद्यालयातील प्राचार्य रोहन बुंदेले, खंडेलवाल महाविद्यालयातील प्राचार्य डॉ.डिम्‍पल मापारी आदींची उपस्थिती होती.

loading image
go to top