थकीत पिक विम्याच्या मुद्यावर आमदार आक्रमक, दिशा समितीच्या बैठकीत बॅंकेच्या कामावर ओढले ताशेरे

सुगत खाडे
Wednesday, 22 July 2020

केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या अध्यक्षते खाली मंगळवारी (ता. 21) जिल्हाधिकारी कार्यालयात दिशा समितीच्या सभेमध्ये आमदार रणधीर सावरकर यांनी खरीप हंगाम 2019 मधील पात्र 630 शेतकऱ्यांना बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या नाकर्तेपणामुळे पिक विमा मिळाला नसल्याचा मुद्दा लावून धरला. त्यामुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी बॅंकेस 1 कोटी 5 लाख रुपये शेतकऱ्यांना विम्यापोटी विनाविलंब देण्याची केलेली मागणी मंजूर केली.

अकोला   ः केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या अध्यक्षते खाली मंगळवारी (ता. 21) जिल्हाधिकारी कार्यालयात दिशा समितीच्या सभेमध्ये आमदार रणधीर सावरकर यांनी खरीप हंगाम 2019 मधील पात्र 630 शेतकऱ्यांना बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या नाकर्तेपणामुळे पिक विमा मिळाला नसल्याचा मुद्दा लावून धरला. त्यामुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी बॅंकेस 1 कोटी 5 लाख रुपये शेतकऱ्यांना विम्यापोटी विनाविलंब देण्याची केलेली मागणी मंजूर केली.

पंतप्रधान पिक विमा योजनेंतर्गत अकोला तालुक्‍यातील दहीगाव गावंडे, पळसो, कौलखेड जहांगीर या परिसरातील सुमारे 630 शेतकऱ्यांनी बॅंक ऑफ महाराष्ट्राचे पळसो शाखेत खरीप हंगामात सन 2019 सोयाबीन पिकासाठी पिक विम्याचे हप्त्याचा भरणा केला होता.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

मंजूर झालेल्या पिक विम्याच्या रकमेसाठी शेतकऱ्यांनी बॅंकेकडे वेळोवेळी मागणी केली असता सतत उडवाउडवी व दिशाभूल करणारी माहिती बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिली. शेतकऱ्यांनी या बाबत कृषी खात्याकडे तक्रारी सुद्धा केल्या या बाबत आमदार रणधीर सावरकर यांनी वेळोवेळी बॅंकेशी संपर्क साधून जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी यांचे सोबत बैठकी सुद्धा घेतल्या. परंतु याविषयी शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्याने दिशा समितीच्या बैठकीय या मुद्यावर आमदार सावरकरांनी बॅंकेच्या अधिकाऱ्यांवर टीका केली. यावेळी इतर शासकीय यंत्रणांच्या कामांचा सुद्धा आढावा घेण्यात आला. बैठकीला जिल्हाधिकारी पापळकर यांच्यासह विविध शासकीय यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

(संपादन - विवेक मेतकर)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA aggressive on Akola crop insurance issue, Tashree pulls on bank work in direction committee meeting