esakal | शून्य भांडवालावर आमदारकी देणारा पक्ष राष्ट्रवादीच!
sakal

बोलून बातमी शोधा

amol mitkari

आतापर्यंत झिरो बजेट शेती ऐकली असेल...शून्य भांडवालावर आमदारकी हे प्रथमच ऐकला मिळत असेल. माझ्या सारख्या अतिवंचित तरूणाला एक रुपयाही न घेता शून्य भांडवलावर आमदारकी दिली. माझ्या रुपयाने तरूणांना हा अनुभव आला असेल. हे राष्ट्रवादीच करू शकते.  पक्षासाठी सकारात्मक काम केले तर राष्ट्रवादी काँग्रेस तरूणांना संधी हे या निमित्ताने दिसून आल्याचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगितले. 

शून्य भांडवालावर आमदारकी देणारा पक्ष राष्ट्रवादीच!

sakal_logo
By
मनोज भिवगडे

अकोला :   होय... मी अजितदादांचा निकवर्तीय... विधान परिषदेवर माझी उमेदवारी जाहीर झाली, त्यापूर्वीच पाच महिने आधी अजितदादांनी माझे नाव जाहीर केले होते. त्यामुळे अजितदादा असो व साहेब असो किंवा प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील असो यांचा निकवर्तीय आहेच. अकोला जिल्ह्यात जरी मी सामाजिकदृष्ट्या वंचित असलो तरी पक्ष श्रेष्ठींकडे माझ्या शब्दाला मान आहे. त्याचा फायदा अकोला जिल्ह्याच्या विकासासाठी योजना राबविण्याकरिता निश्‍चितच करून घेईल, असे आमदार अमोल मिटकरी यांनी गुरुवारी अकोला ‘सकाळ’ कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीत बोलताना सांगितले. 


राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष २१ वर्षांचा झाला आहे... हे तरूणाईचे वय...म्हणजे आमचा पक्ष तरूण झाला आहे...या पक्षातच तरूणांना संधी मिळू शकते...योग्य टाईम साधून पक्षासाठी काम केले तर शून्य भांडवालावर आमदारकी देणारा पक्ष राष्ट्रवादीच आहे, हा अनुभव माझ्या निमित्ताने तरूणांना आला असेल. साहेबांनी माझ्यावर पक्ष वाढीची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे आधी काय झाले, कोण कुणाच्या गटाचा या भानगडीत न पडता साहेबांच्या विश्‍वासातील नेत्यांच्या मार्गदर्शनात मी अकोला जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला करून दाखवेल, असा दृढ आत्मविश्‍वस आमदार अमोल मिटकर यांनी गुरुवारी (ता.१८) ‘सकाळ’ कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीत व्यक्त केली. यावेळी सकाळ कार्यालयातील सहकाऱ्यांसोबत त्यांना मुक्त संवाद साधला. त्यांच्यासोबत शेतकरी नेते कृष्णा अंधारे होते. 


जिल्ह्यातील प्रख्यात व्याख्याता अमोल मिटकरी यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधान परिषदेची आमदारकी दिली. या निमित्ताने त्यांने त्यांच्याशी संवाद साधला असताना पक्षाचे व्‍हिजन असलेल्या शेती, शिक्षण, आरोग्य व उद्योग या क्षेत्राला केंद्रीत माणून काम करणार असल्याचे सांगितले. अकोला जिल्ह्यातील विकासाचा अनुशेष दूर करण्यासाठी काम करण्याची संधी आहे. मला मिळालेली आमदारकी ही मी संधी माणतो. आखलेल्या योजना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी अकोला जिल्हा आधी राष्ट्रवादी मय होणे आवश्‍यक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांपासून प्रत्येक पातळीवर हा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असा होईल, याची जबाबदारी पक्षाने माझ्यावर सोपविली आहे. ते करीत असताना पक्षातील अंतर्गत गटबाजीसोबतच भाजप व वंचित बहुजन आघाडी या विरोधी पक्षांचे आव्हानही असेल. दोन माजी आमदार आमच्या पक्षात आले. त्यामुळे आता मागे काय झाले त्याचा विचार न करता पुढे आमच्याच पक्षातील सहकार क्षेत्रातील नेत्यांच्या मार्गदर्शनात पक्ष बळकटीसाठी प्रयत्न करणार आहे, असे आमदार मिटकरी म्हणाले. 

शून्य भांडवालावर आमदारकी राष्ट्रवादीच देवू शकते!
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष २१ वर्षांचा झाला आहे... हे तरूणाईचे वय...म्हणजे आमचा पक्ष तरूण झाला आहे...या पक्षातच तरूणांना संधी मिळू शकते... पक्षासाठी सकारात्मक काम केले तर शून्य भांडवालावर आमदारकी देणारा पक्ष राष्ट्रवादीच आहे, हा अनुभव माझ्या निमित्ताने तरूणांना आला असेल. साहेबांनी माझ्यावर पक्ष वाढीची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे आधी काय झाले, कोण कुणाच्या गटाचा या भानगडीत न पडता साहेबांच्या विश्‍वासातील नेत्यांच्या मार्गदर्शनात मी अकोला जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला करून दाखवेल, असा दृढ आत्मविश्‍वस आमदार अमोल मिटकर यांनी गुरुवारी (ता.१८) ‘सकाळ’ कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीत व्यक्त केली.