esakal | आ.गायकवाड यांनी मद्यधुंद पोलिसाच्या कानाखाली वाजवली
sakal

बोलून बातमी शोधा

buldhana

आ.गायकवाड यांनी मद्यधुंद पोलिसाच्या कानाखाली वाजवली

sakal_logo
By
मुशीर खान कोटकर

देऊळगावराजा (जि. बुलढाणा) : मद्यधुंद अवस्थेत महामार्गावर नाचणाऱ्या तथाकथित पोलिसांमुळे ट्राफिक जाम झाली तेवढ्यात औरंगाबाद येथून बुलढाणा कडे जाणारे आमदार संजय गायकवाड यांनी सदर पोलिसाला कानाखाली वाजवली अन् पोलीस लिहिलेली पाटी आलेल्या कार मध्ये बसून मद्यपी पोलिसांनी पळ काढला. सदर प्रकार देऊळगाव मही नजीक सरंबा फाट्यावर आज सायंकाळी सहाच्या सुमारास घडला

याबाबत प्राप्त माहिती नुसार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राणा चंदन यांना औरंगाबाद येथे रुग्णालयात भेटून आमदार संजय गायकवाड पत्रकार अजय बिल्लारी परत येत होते. देऊळगाव मही च्या सरंबा फाट्यानजीक पुढे महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. ठप्प झालेल्या वाहतूक इथून पुढे जाऊन पाहिले असता रस्त्याच्या मधोमध पोलीस गेलेल्या पाटी असलेली एम एच २८ ए.एन ३६४१ क्रमांकाच्या पांढर्या रंगाच्या कार समोर काही व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत नाचत होते.

हेही वाचा: एकाच कुटुंबातील पाच मुलं बुडाली; राजस्थानमधील हृदयद्रावक घटना

परिणामी चिखली येथून येणारी वाहतूक दूरपर्यंत ठप्प झाली होती. हा प्रकार पाहून बुलढाणा येथील आमदार संजय गायकवाड यांचा राग अनावर झाला व त्यांनी त्या तथाकथित पोलिसाला कानाखाली दोन वाजवली. अचानक घडलेल्या या प्रकाराने भांबावलेल्या त्यामध्ये मद्यधुंद व्यक्तींचा डान्स बंद झाला व पोलीस लिहिलेल्या त्या ढवळ्या रंगाच्या कार मध्ये बसून त्यांनी पळ काढला बुलढाणा पासिंग असलेल्या त्या कार द्वारे नेमका कुठल्या पोलीस ठाण्यातील मद्यधुंद पोलीस प्रवास करीत होते याचा उलगडा झाला नव्हता.

loading image
go to top