esakal | एकाच कुटुंबातील पाच मुलं बुडाली; राजस्थानमधील हृदयद्रावक घटना
sakal

बोलून बातमी शोधा

चितौडगड: एकाच कुटूंबातील ५ मुलं बुडाली

एकाच कुटुंबातील पाच मुलं बुडाली; राजस्थानमधील हृदयद्रावक घटना

sakal_logo
By
सुधीर काकडे

राजस्थानच्या उदयपुर (Udaypur, Rajasthan) जिल्हातील चितौडगडमध्ये (Chittorgarh) घडलेल्या घटनेमुळे जिल्ह्यात सर्वत्र शोककळा पसरली आहे. चितौडगडमधील मंगलवाड या गावात ५ मुलांचा तलावात बुडून (Drowned) मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. मृत पाचही जण हे एकाच कुटूंबातील असल्याने सर्वत्र हळ हळ व्यक्त केली जाते आहे. चित्तौडगड जिल्ह्यातील मंगलवाड या गावातील मुलं नेहमी प्रमाणे तलावात आंघोळ करण्यासाठी गेले असताना ही घटना घडली आहे.

चित्तौडगड जिल्ह्यातील मंगलवाड या गावातील मुलं गावाजवळच्या तलावात गेली असता पाण्याचा अंदाज न आल्याने ही मुलं पाण्यात बुडाली. यावेळी आजुबाजूला उपस्थित असलेल्या काही लोकांनी या मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला. या ५ मुलांपैकी फक्त एकाच मुलाला बाहेर काढण्यात लोकांना यश आले आणि इतर चार जणांचा तिथेच मृत्यू झाला. पाण्याबाहेर काढलेल्या एका मुलाला उपचारासाठी दवाखन्यात नेण्यात आले होते. मात्र या मुलाचा सुद्धा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याचे समजते आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी देखील या घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून, कुटूंबाच्या सोबत असल्याचे सांगितले. 'चित्तौडगडच्या मंगळवाड परिसरात असलेल्या तलावात बुडून 5 मुलांचा मृत्यू अत्यंत हृदयद्रावक आणि दुर्दैवी आहे. माझी सहानुभूती मुलांच्या कुटुंबासोबत आहे, देव त्यांना या कठीण काळात शक्ती देवो.' अशा भावना अशोक गेहलोत यांनी यावेळी व्यक्त केल्या.

हेही वाचा: कोरोनाची लस खरी की बनावट कशी ओळखाल?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही पाचही मुलं मंगलवाड गावातील एकाच कुटूंबातली होती. नेहमीप्रमाणे ही मुलं तलावात आंघोळकरण्यासाठी गेली असता ही घटना घडली आहे. 'घडलेली घटना ही अत्यंत दुर्देवी असून, या कुटूंबाला प्रशासनाकडून मदत करण्यात येईल.' अशी माहिती उदयपुरचे पोलिस महासंचालक हिंगलाज दान यांनी दिली आहे.

loading image
go to top