अकाेला: अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

घटनेच्या काही तासातच आरोपी गजाआड
अकाेला: अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
अकाेला: अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल saka
Updated on: 

मूर्तिजापूर : स्थानिक एका १४ वर्षीय शालेय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनी शाळेतून परत येत असताना भीम नगर येथील २२ वर्षीय युवकाने वाईट इराद्याने छेड काढून तिच्याशी लगट करून विनयभंग केल्याची घटना १० डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान घडली.

मिळालेल्या माहितीनुसार शहरातील गौतम नगर परिसरात राहणारी एका १४ वर्षीय शालेय विद्यार्थिनी शाळेतून घरी परत येत असताना भीम नगर येथे राहणाऱ्या आरोपी गौरव नारायण भगत (वय २२) याने वाटेत सदर अल्पवयीन मुलीची छेड काडून तिला बळजबरीने आपल्या दुचाकीवर बसविण्याकरिता तिच्या अंगाशी छेडखाणी करून तिचा विनयभंग केला. त्यासोबतच बळजबरी तिचा गाडीने पाठलाग करून वाईट इराद्याने तिला स्वतःच्या गाडीवर बसवून स्वतःच्या घरी नेण्याकरिता जबरदस्ती करीत धमकी दिली.

अकाेला: अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
अकोला : स्ट्रॉंगरूमला पोलिसांचा पहारा; मतमोजणी उद्या

त्यामुळे या प्रकरणी फिर्यादीवरून आरोपी गौरव नारायण भगत याच्याविरुद्ध सिटी पोलिस ठाण्यात कलम ३५४, ३५४ (अ), ३५४ (ड), ५०६ भादंवि सहकलम १, २ पोस्को नुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणी आरोपी गौरव नारायण भगत यास तत्काळ अटक करून गजाआड करण्यात आले. पुढील तपास ठाणेदार संजय सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक स्मिता पाटील करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

water issue in akola
Agriculture Loss by No Rain
Engineer Shriram Hazare Donates Award Money for Drought-Affected Farmers
Khamgaon APMC Extends Financial Aid of Rs 11 Lakhs for Drought-Affected Farmers
Marathi News Esakal
www.esakal.com