
अकोला : जिल्ह्यासह शहरात गेल्या आठवडाभरापासून पाऊस सुरू आहे. या काळात कॉलरा, टायफॉईड, लेप्टोस्पायरोसिस, कावीळ अशा जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका अधिक असतो. घराच्या परिसरात साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावावी, मच्छरांचा प्रादुर्भाव होणार नाही, याची काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य यंत्रणेमार्फत करण्यात आले आहे.