दिवसा दिसणार शुक्राची चांदणी! अशक्यप्राय प्रयत्न

७ डिसेंबर रोजी पश्चिम आकाशात चंद्र व शुक्र युती घडून येत आहे
शुक्र
शुक्रशुक्र

पातूर (जि. अकोला) : भविष्यात बालवैज्ञानिक तयार व्हावे, अवकाशातील ग्रह, उपग्रह, तारखा, उल्का, धूमकेतू इत्यादी विविध प्रकारच्या खगोल विज्ञानातील खगोलीय घटनांची माहिती व परिचय व्हावा, ग्रहतारे या संबंधित असणारी अंधश्रद्धा दूर व्हावी यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर (Suchita Patekar) यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी ‘चला सज्ज होऊया अवकाशात फेरफटका मारू या’ असा नारा दिला.

दिवसा सूर्याच्या प्रकाशामुळे आकाशात (moon of Venus will appear during the day) चांदण्या असूनही पाहता येत नाहीत; परंतु याला अपवाद एकमेव शुक्र ग्रहाचा असतो. ज्यावेळी शुक्र पृथ्वीला जवळ व सूर्यापासून अधिक अंतरावर असतो त्यावेळी शुक्र आकाशात सूर्याच्या उपस्थितीतही पाहता येऊ शकतो. रात्री शुक्र प्रकाशात सावल्याही पाहता येतात.

शुक्र
मॉडेलवर तिघांनी केला सामूहिक बलात्कार; व्हिडिओही केला तयार

७ डिसेंबर रोजी पश्चिम आकाशात चंद्र व शुक्र युती घडून येत आहे. नवीन खगोलप्रेमीस शुक्र परिचय व दिवसा दर्शनाचा अलभ्यलाभ घेता येईल. त्यासाठी दिवसा चार वाजताच्या आसपास एखाद्या इमारतीच्या सावलीच्या आधारे प्रथम चतुर्थीची चंद्रकोर पाहायची. त्यानंतर त्याच्या जरा उत्तरेस एक अंश अंतरावर खालच्या बाजूस शुक्र ग्रह पाहता येईल.

‘दिनमे तारे दिखाना’ या उक्तीचा अशक्यप्राय प्रयत्न काही वेळाचे निरीक्षणातून साध्य करता येईल. त्यासाठी सोबतच्या आकृतीचा वापर करून चंद्राजवळच शुक्र उणे ४.५ प्रतीचा व काही वेळाने साधारण ६ वाजता त्यांच्या वरचे बाजूस कुंभ राशीतील गुरू ग्रह व ६.३० च्या सुमारे गुरू शुक्रचे मध्यभागी शनी बघता येईल.

शुक्र
अभिनेत्रीने मुलासोबत पोस्ट केला अश्लील फोटो; तीन महिन्यांची शिक्षा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com