मॉडेलवर तीन दिवस तिघांनी केला सामूहिक बलात्कार; व्हिडिओही केला तयार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

atyachar

मॉडेलवर तिघांनी केला सामूहिक बलात्कार; व्हिडिओही केला तयार

केरळ : फोटोशूट करण्यासाठी एक मॉडेल केरळमध्ये आली होती. ती लॉजमध्ये राहत होती. तिला तिघांनी दारू पाजली. या दारूमध्ये नशेची औषध मिळवण्यात आली होती. यानंतर तिघांनी तिच्यावर सलग तीन दिवस सामूहिक बलात्कार केला. तसेच घटनेचा व्हिडिओही तयार केला. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे, तर दोघांचा शोध घेण्यात येत आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलप्पूरम येथील रहिवासी असलेली मॉडेल फोटोशूट करण्यासाठी केरळमध्ये आली होती. ती केरळमधील एका लॉजवर राहिली होती. ती सलीम कुमार (३३) याला आधीपासूनच ओळखत होती. सलीम कुमार आणि त्याचे अन्य दोन साथीदार अजमल आणि शमीर असे तिघेही तिच्या लॉजवर आले.

हेही वाचा: निवडणुकीत बसप राहणार तटस्थ; कोणाला बसणार फटका?

तिथे तिघांनी तिला नशेची औषध टाकलेले पेय प्यायला दिले. नशा चढल्यानंतर तिला दारूही पाजली. यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. नमूद आरोपींनी एस ते तीन डिसेंबर असे सलग तीन दिवस बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने तक्रारीत केला आहे. इतकेच नव्हे तर आरोपींनी या घटनेचा व्हिडिओही तयार केला. हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर पुन्हा बलात्कार केला.

एकाला अटक; दोघांचा शोध सुरू

सलीम कुमार (३३) हा मॉडलचा ओळखीचा होता. त्यानेच तिची राहण्याची व्यवस्था लॉजवर केली होती. लॉजच्या मालकासह तिन्ही आरोपींनी तिला नशा मिसळलेले पेय पाजले. यानंतर दारू पाजून सामूहिक बलात्कार केला. इन्फोपार्क पोलिसांनी गुन्हा दाखल करून सलीम कुमारला अटक केली आहे. तर अन्य दोन आरोपींचा शोध पोलिस घेत आहे.

Web Title: Model Photoshoot Mass Atrocities Kerala News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..