esakal | क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी, दोन खासगी बसवर कारवाई

बोलून बातमी शोधा

क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी, दोन खासगी बसवर कारवाई

क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी, दोन खासगी बसवर कारवाई

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाशीम : जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली असून, अत्यावश्यक कारणासाठीच नागरिकांना घराबाहेर परवानगी देण्यात आली आहे, तसेच प्रवासी वाहतुकीसाठी सुद्धा नियमांच्या अधीन राहून परवानगी देण्यात आली आहे,

मात्र खासगी प्रवासी बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक होते, तसेच कोरोना सुरक्षा नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी वाशीम उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या व्हॉट्सऍप क्रमांकावर प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार अकोला-शेलुबाजार मार्गावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या दोन खासगी बस उप प्रादेशिक परिवहन विभागाने ता.१८ एप्रिल रोजी ताब्यात घेतल्या आहेत.

संचारबंदी काळात वैध कारणासाठी प्रवासी वाहतूक सुरू राहणार असून, ऑटोरिक्षामध्ये चालक व दोन प्रवासी, टॅक्सीमध्ये (चारचाकी) चालक व उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी मान्यता दिलेल्या क्षमतेच्या ५० टक्के प्रवासी, बसमध्ये उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी मान्यता दिलेल्या क्षमतेएवढे प्रवासी घेण्यास मुभा आहे, मात्र उभा राहून प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे.