
म्हैस शोधण्यासाठी गेलेल्या आई, मुलींचे मृतदेहच परतले; बुडून मृत्यू
बार्शीटाकळी (जि. अकोला) : तालुक्यातील दगडपारवा येथील धरणाच्या सांडव्यात तीन मायलेकींचा बडून मृत्यू (died) झाला. ही घटना सोमवारी (ता. २) पहाटे उघडकीस आली. म्हैस शोधण्यासाठी रविवारी (ता. १) दुपारी घराबाहेर पडलेल्या मायलेकी परत आल्याच नाही. शोधाशोध सुरू केली असता धरणाच्या सांडव्याजवळ आढळून आलेल्या चप्पलने घटनेचा उलगडा झाला. सरिता सुरेश घोगरे (४०) असे आईचे, अंजली (१६) आणि वैशाली (१४) असे मृतांचे नाव आहे. (Mother and daughter died in Akola)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोगरे कुटुंबातील दोन मुली आणि आई म्हशीचा शोध घेण्यासाठी रविवारी दुपारी तीन वाजतापासून घरून निघाल्या होत्या. त्या रात्री उशिरापर्यंत घरी परतल्या नाही. त्यामुळे कुटुंब प्रमुख सुरेश घोगरे व परिसरातील नागरिकांनी शोधाशोध सुरू केली. नागरिकांना धरणाच्या काठावर चप्पल दिसून आली. त्यामुळे धरण्यात शोध सुरू केला.
हेही वाचा: मायलेकांसाठी ‘तो’ प्रवास ठरला शेवटचा; टिप्परने धडक दिल्याने मृत्यू
पिंजर येथीळ संत गाडगेबाबा शोध व बचाव पथकालाही बोलाविण्यात आले होते. मात्र, ते पोहोचण्यापूर्वीच पहाटे दोन मृतदेह तरंगताना (died) दिसले. एक मृतदेह सोमवारी सकाळी तरंगताना दिसला. याप्रकरणी बार्शीटाकळी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. बचाव पथकासह गावकऱ्यांच्या मदतीने मायलेकींचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी (Autopsy) अकोला शासकीय रुग्णालयात पाठवले. घटनास्थळी तहसीलदार गजानन हामंद यांनी भेट दिली.
घोगरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर
आईसह दोन्ही मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने घोगरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर दगडपारवा भागात हळहळ व्यक्त होत आहे. सोमवारी (ता. २) तिघींच्या मृतदेहावर मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. मायलेकींचा खरचं अपघाती मृत्यू झाला की घातपात होता? याचा तपास बार्शीटाकळी पोलिस करीत आहे. याप्रकरणी पोलिसांनी सध्या अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.
Web Title: Mother And Daughter Died Crime News Akola District Drowning
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..