
मायलेकांसाठी ‘तो’ प्रवास ठरला शेवटचा; टिप्परने धडक दिल्याने मृत्यू
वरठी (जि. भंडारा) : दिवसेंदिवस अपघाताचे (Road Accident) प्रमाण वाढत चालले आहेत. मात्र, यातून कोणीही कोणताच बोध घेत असल्याचे पाहायला मिळत नाही. यात मात्र, निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. यात कधी त्यांची चुकी असते तर कधी दुसऱ्यांची. असाच प्रकार भंडारा जिल्ह्यातील वरठी सोमवारी (ता. २) सकाळी ८.४५ वाजताच्या सुमारास घडला. या अपघातात मायलेकाला जीव (died) गमवावा लागला. (Son and mother died in road accident at bhandara district)
प्राप्त माहितीनुसार, सातोना-नागपूर मार्गावरून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या मोहदुरा परिसरातील वळणावर सोमवारी दुचाकीचा भीषण अपघात झाला. भरधाव टिप्परने दुचाकीला जोरदार धडक (Road Accident) दिल्याने राजू शामराव रहांगडाले (२६) व आई गीता राहांगडाले (५०) दोघेही राहणार वाठोळा, नागपूर यांचा जागीच मृत्यू झाला.
हेही वाचा: आरत्यासंदर्भात राज ठाकरे यांचा मनसे सैनिकांसाठी नवा आदेश
रहांगडाले मायलेक सोमवारी दुचाकीने भंडारा जिल्ह्यातील तिरोडा येथे जात होते. दरम्यान, नागपूरच्या दिशेने जात असलेल्या टिप्पर क्रमांक एमएच ३६ एए ६४६१ ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात मायलेकांचा जागीच मृत्यू (died) झाला. टिप्पर चालक अजित हेमराज भोयर (२६) याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलिसांनी ट्रकला ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. घटनेचा पुढील तपास वरठी पोलिस ठाण्याचे निरीक्षक मेश्राम, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुबोध वंजारी करीत आहे.
Web Title: Road Accident Son And Mother Died Crime News Bhandara District
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..