Water crisis
अकोला/अकोट - अकोट ८४ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या देखभाल दुरूस्तीसाठी मजीप्राला जिल्हा परिषदेकडून निधी मिळत नसल्याने मजीप्राने योजनेतून करण्यात येणारा पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा दिला आहे.
त्यामुळे ८४ गावांवर जलसंकटाचे ढग दाटून आले असून हिवाळ्यातच ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते. याबाबत मजीप्राने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला पत्र लिहून २५ डिसेंबरपासून पाणीपुरवठा बंद करण्यात येईल, अशी चेतावणी दिली आहे.