मुख्यमंत्री महोदय, एक काम करा; घर टॅक्स, वीज बिल रद्द करा!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 16 June 2020

राज्यात गत तीन महिन्यांपासून कोरोनामुळे उद्‍भवलेल्या लॉकडाउनमध्ये आर्थिक संकटाचा सामना करीत असणाऱ्या मध्यमवर्गीय गरीब नागरिकांचे तब्बल सहा महिन्यांचे घर कर, विद्युत बिल समवेत सर्व टॅक्स रद्द करून या वर्गाला आर्थिक संकट पासून संरक्षण देण्याची वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाच्या अकोला शाखेच्या वतीने मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन देऊन केली.

अकोला ः राज्यात गत तीन महिन्यांपासून कोरोनामुळे उद्‍भवलेल्या लॉकडाउनमध्ये आर्थिक संकटाचा सामना करीत असणाऱ्या मध्यमवर्गीय गरीब नागरिकांचे तब्बल सहा महिन्यांचे घर कर, विद्युत बिल समवेत सर्व टॅक्स रद्द करून या वर्गाला आर्थिक संकट पासून संरक्षण देण्याची वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाच्या अकोला शाखेच्या वतीने मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन देऊन केली.

राज्यात करोना संक्रमण वेगाने वाढत आहे. हे संकट आगामी सप्टेंबर महिन्यापर्यंत राहणार असल्याचे बोलल्या जात आहे. मार्चपासून मध्यम वर्गीय व गरीब वर्गाचा रोजगार नष्ट झाल्यामुळे या वर्गाच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हा वर्ग मदत वा सहायता मागण्यात संकोच करीत असतो. म्हणून कोणत्याही सामान्य शासकीय योजना पासून हा वर्ग वंचित राहिला आहे. एकीकडे बेरोजगारी तर दुसरीकडे आर्थिक संकट अशा खाईत सापडलेल्या या गरीब मध्यमवर्गीय वर्गाच्या आर्थिक समस्या लक्षात घेता सहा महिन्यांचे घर, विद्युत व अन्य कर रद्द करण्यात यावे अशी बाब निवेदनात नमूद करण्यात आली आहे.

तसेच या माफीचा लाभ गरीब मध्यमवर्गीय वर्गा समवेत कास्तकार, मजूर आदी वर्गाला ही देण्यात येण्याचे नमूद करण्यात आले. वेल्फेअर पार्टीचे जिल्हाध्यक्ष मेहमूद उस्मान शे.अन्वर यांच्या नेतृत्वात देण्यात आलेल्या निवेदन प्रसंगी वेलफेयर पार्टीचे महानगर अध्यक्ष अजहर चौधरी, कलीम खान,जहीर मुल्ला, छोटे खान आदी पदाधिकारी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mr. Chief Minister uddhav thakre , please cancel house tax, electricity bill, akola marathi news