Akola : ग्रामस्थांच्या सोयीसाठी आजी-माजी पदाधिकारी आले एकत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MSEDCL Akola electricity supply cut

Akola : ग्रामस्थांच्या सोयीसाठी आजी-माजी पदाधिकारी आले एकत्र

माझोड : येथील विद्युत ग्राहक संख्या पाहता गावातील एका रोहित्रावर जास्त दाब येत असल्यामुळे दिवसातून दर दोन-तीन तासाने रोहित्र बंद पडत असल्यामुळे रात्री-बेरात्री विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे गावात नवीन रोहित्र्याची मागणी केल्या जात होती. नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत आजी-माजी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन गावात नवीन रोहित्र आणले.

गावात एकच रोहित्र असल्यामुळे वारंवार विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या घटना घडत होत्या. त्यामुळे रात्री-बे-रात्री ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. माजी सरपंच ज्योत्स्ना खंडारे यांनी त्यांच्या कार्यकाळात नवीन रोहित्राचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर केला होता. त्यांच्या कार्यकाळात रोहित्र मंजूर होऊन दोन ते तीन विद्युत खांबही उभारण्यात आले होते.

मात्र काही शेतकऱ्यांनी शेतातून विद्युत खांब टाकू न दिल्यामुळे रोहित्राचे काम झाले नाही. आता मात्र विद्युत पुरवठा खंडित होण्याचा जास्तच त्रास होत असल्यामुळे ग्रामस्थांचा रोहित्रासाठी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांवर दबाव वाढला, त्यामुळे विद्यमान सरपंच-उपसरपंच, सदस्य, मुक्ता ताले, राजेश ठाकरे, माजी सरपंच जोत्स्ना खंडारे यांनी एकत्र येऊन आ.रणधीर सावरकर यांच्याकडे गावात नवीन रोहित्राची मागणी केली.

आ. सावरकर संबंधितांसोबत चर्चा करून माझोड गावासाठी तत्काळ नवीन रोहित्र मंजूर करून दिले. आता लवकरच गावात नवीन रोहित्राची उभारणी होऊन गावात वीज पुरवठा खंडित होण्याच्या त्रासापासून ग्रामस्थ मुक्त होणार आहेत. ग्रामस्थांच्या सुविधेसाठी आजी-माजी पदाधिकारी एकत्र आल्यामुळे ग्रामस्थांनी सर्वांचे आभार मानले.

Web Title: Msedcl Akola Electricity Supply Cut Villagers Inconvenient Former Officials

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..