esakal | दिलासादायक; कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांना आता मिळणार पगारी सुटी
sakal

बोलून बातमी शोधा

MSEDCL coronated employees will now get paid leave

दिलासादायक; कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांना आता मिळणार पगारी सुटी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमधील (The second wave of corona virus) अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुरळीत वीजपुरवठ्यासाठी अहोरात्र सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना वैद्यकीय व आर्थिक सहायता करणारे विविध निर्णय महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी घेतले आहेत. यामध्ये कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांना उपचाराच्या तसेच विलगीकरणाच्या कालावधीची पगारी रजा मंजूर करण्यात आली आहे. (MSEDCL corona employees will now get paid leave)

कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांच्या उपचाराचा किंवा विलगीकरणाचा कालावधी हा कर्तव्य कालावधी समजून पगारी रजा मंजूर करण्यात आली आहे. वेतनश्रेणी तीन व चारमधील सर्व कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर किट खरेदीसाठी एकवेळा एक हजार रुपये विशेष बाब म्हणून देण्यात येणार आहे.

हेही वाचा: लॉकडाउन दुकान उघडाल तर कारवाई होणारच!

कोरोनामुळे रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना अग्रीम म्हणून ५० हजार रुपये आणि घरी किंवा संस्थात्मक कक्षात विलगीकरणात उपचार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना २५ हजार रुपये अग्रीम मंजूर करण्यात आला आहे. कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना ३० लाख रुपयांचे सानुग्रह सहाय्य तसेच विम्याचे २० लाख असे एकूण ५० लाख रुपयांची मदत करण्यात येत आहे. यामध्ये महावितरणच्या सर्व नियमित (प्रशिक्षणार्थी व सहायक यांच्यासह) व बाह्यस्त्रोत कर्मचारी व सुरक्षा रक्षकांच्या वारसांचा समावेश आहे.

संपादन - विवेक मेतकर

MSEDCL corona employees will now get paid leave