esakal | लॉकडाउन दुकान उघडाल तर कारवाई होणारच!
sakal

बोलून बातमी शोधा

लॉकडाउन दुकान उघडाल तर कारवाई होणारच!

लॉकडाउन दुकान उघडाल तर कारवाई होणारच!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः कोरोनाच्‍या (Corona Virus) पार्श्‍वभूमीवर अकोला महानगरपालिका (Akola Muncipal Corporation) क्षेत्रातील विविध भागातील व्‍यावसायिक प्रतिष्‍ठानावर लॉकडाउन (Lockdown in Akola) नियमाचे उल्‍लंघन केल्‍यामुळे २० दुकानदारांवर एकूण ५७ हजार रुपयांची दंडात्‍मक कारवाई करण्‍यात आली. (Penalties for violating lockdown rules in Akola)

हेही वाचा: रक्ताच्या नात्यांनी नाकारले; दीपकने केला स्वीकार!

कारवाई करण्यात आलेल्या प्रतिष्ठानांमध्ये पिंजारी गल्‍ली येथील मोहन मॅचींग सेंटर, सुरत साडी सेंटर, शगुन साडी सेंटर, मॉं शाकंम्‍भरी साडी सेंटर, आकाश साडी सेंटर, ओम फॅशन, सुहानी साडी सेंटर, जुना कपडा बाजार येथील पुष्‍पक हाऊस, सोनी फॅशन, टिळक रोडवरील खत्री होम अप्‍लायन्‍सेस, प्रवीण क्रिएशन, प्रितम फुटवेअर, साईबाबा मार्केटींग आणि मेहता ईलेक्‍ट्रीकल्‍स व बाहेती ब्रदर्स खेतान गल्‍ली येथील क्‍वालिटी हार्डवेअर, फतेह चौक येथील दीपक कलेक्‍शन, रूपम-रोशन राठी आदींचा समावेश आहे. इंदौर गल्‍ली येथील अनवरभाई चप्‍पलवाले आणि अलंकार मार्केट येथील श्री मार्केटींग यांच्‍यावरही कारवाई करण्यात आली आहे.

संपादन - विवेक मेतकर

Penalties for violating lockdown rules in Akola

हेही वाचा: रेड झोन; १ जूननंतरही लॉकडाउनमधून सुटका अशक्य