३८१७ वीज ग्राहकांना महावितरणचा ‘शॉक’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MSEDCL

३८१७ वीज ग्राहकांना महावितरणचा ‘शॉक’

अकोला - महावितरणच्या अकोला झोनमध्ये येणाऱ्या अकोला, बुलडाणा व वाशीम जिल्ह्यात थकीत देयकांच्या कारणावरून आतापर्यंत ३८१७ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. देयके नियमित न भरणाऱ्यांविरुद्ध महावितरण आणखी आक्रमक भूमिका घेत आहे.

अकोला झोनमधील सर्व विभागांत थकीत देयकांची संख्या मोठी आहे. परिणामी महावितरणकडून देयक वसुलीसाठी मोहीम आखली जात आहे. नियमित देयके न भरणाऱ्यांविरुद्ध कठोर पावले उचलून थेट वीजपुरवठा खंडित केला जात आहे. आतापर्यंत महावितरणने अकोला, बुलडाणा व वाशीम जिल्ह्यातील ३८१७ ग्राहकांना वीजपुरवठा खंडित करून ‘शॉक’ दिला आहे. वीजपुरवठा खंडित केलेल्या सर्कलनिहाय वीज ग्राहकांमध्ये अकोला १२४७, बुलडाणा १८४९ तर वाशीम जिल्ह्यातील ७२१ ग्राहकांचा समावेश आहे.

कायमस्वरूपी वीजपुरवठा होईल खंडित

महावितरणकडून वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या काळासाठी खंडित करण्यात येतो. त्यानंतर ग्राहकांनी ठरावीक मुदतीत वीजबिल भरण्यास सांगण्यात येते. या मुदतीत देयक भरणा न केल्यास कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्याचे संकेत महावितरण प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

Web Title: Msedcls Shock To 3817 Electricity Customers

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top