esakal | तीन अनाधिकृत बांधकामावर महापालिकेची कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

तीन अनाधिकृत बांधकामावर महापालिकेची कारवाई

तीन अनाधिकृत बांधकामावर महापालिकेची कारवाई

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः महानगरपालिका उत्‍तर झोन अंतर्गत माळीपुरा येथे मोहम्मद शकील शेख चांद यांनी केलेल्या अनाधिकृत बांधकामावर मनपा आयुक्‍त नीमा अरोरा यांच्‍या आदेशान्‍वये मंगळवारी (ता. १३) जुलै रोजीकारवाई करण्‍यात आली. याचसोबत अकोट फैल येथील मच्‍छी बाजार येथे रवि मेश्राम यांनी सरकारी जागेवर वीटांचे बांधकाम करून टीनशेड आणि शर्टर लावून दुकानाचे अतिक्रमण केले होते. त्यावर सुद्धा अतिक्रमणावर विभागाच्या वतीने कारवाई करण्‍यात आली. गवळीपुरा येथे नाला सफाईच्‍या कामात अडचण निर्माण करणारे नाल्‍यावरचे अतिक्रमण आणि धापे काढण्‍याची कारवाई सुद्धा महापालिकेच्या वतीने करण्‍यात आली. (Municipal action on three unauthorized constructions)

हेही वाचा: ताई तुम्हाला अश्वत्थामा बनवलं गेलंय, अमोल मिटकरींची पंकजा मुंडेंसाठी खास पोस्ट


संत तुकाराम चौक, डाबकी रोड येथील मालमत्‍ता सील
महानगरपालिका दक्षिण क्षेत्राअंतर्गतील संत तुकाराम चौक येथील मालमत्‍ता क्रमांक ४४४ धारक पाथार, मेहूल ट्रेडर्स यांचे कडे सन् २०१८-१९ ते चालू वर्षापर्यंत ४ लाख ८६ हजार ३२३ रुपयांचा मालमत्‍ता कर थकीत आहे. त्यामुळे त्‍यांच्‍या मालमत्‍तेतील दुकान आणि कार्यालयाला मनपा आयुक्‍त नीमा अरोरा यांच्‍या आदेशान्‍वये व सील लावण्‍याची कारवाई करण्‍यात आली. त्यासोबतच पश्चिम झोन अंतर्गत डाबकी रोड येथील वार्ड क्रमांक बी-७ मालमत्‍ता क्रमांक ३८ सौ. यमुनाबाई नळकांडे हस्‍ते अशोक झांझोटे यांच्‍याकडे सन् २०१६-१७ ते आजपर्यंत १ लाख ६१ हजार ५२६ एवढा थकीत मालमत्‍ता कर असल्‍याने त्‍यांच्‍या मालमत्‍तावर सुद्धा महापालिकेच्या वतीने मंगळवारी (ता. १३) सील लावण्‍याची कारवाई करण्‍यात आली.

संपादन - विवेक मेतकर

Municipal action on three unauthorized constructions

loading image