

Akola News
esakal
मूर्तिजापूर: शहरातील वडरपुरा परिसरात दोन डुकरं व एक बकरी चोरी करून दुचाकीवरून पळवून नेण्याचा प्रयत्न स्थानिकांच्या सतर्कतेमुळे उधळून लावण्यात आला. या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, मारहाण व जीवे मारण्याच्या धमकीमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.