
अकाेला : प्लॉट विक्रीच्या नावाखाली सहा लाखांची फसवणूक
मूर्तिजापूर : शहरातील प्रॉपर्टी ब्रोकरने रेल्वेतील सेवानिवृत्त महिलेची प्लॉट विक्रीच्या नावाने आर्थिक फसवणूक केल्याचा घटनेची फिर्याद येथील शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आल्यानंतर दोन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येथील सतीश प्रभूदयाल दज्जुका व जया डिगांबर वाकोडे यांनी दोघांनी संगनमत करून रेल्वेतून सेवा निवृत्त झालेल्या महिलेस प्लॉट विक्रीच्या नावाखाली वेळोवेळी पैसे घेऊन आतापर्यंत सहा लाख ५९ हजाराचा गंडा दिल्याची तक्रार गीताबाई नाईक यांनी २५ जानेवारी रोजी शहर पोलिस स्टेशनला दिली होती.
हेही वाचा: देशातील रुग्णसंख्या खालावली... पण मृत्यूचा आकडा कायम!
शहरात जया वाकोडे नामक महिलेचे प्लॉट असल्याची बतावणी करून ते प्लॉट विक्री आहेत व प्लॉट खरेदी करण्यासाठी तुम्ही इसार पावती करा. त्यासाठी जया वाकोडे व सतीश दज्जुका यांनी रेल्वेत सफाई कामगार म्हणून निवृत्त झालेल्या गीताबाई नाईक यांना वेळोवेळी पैशाची मागणी करून त्यांच्याकडून आतापर्यंत सहा लाख ५९ हजार हडपले असल्याची तक्रार नाईक यांनी २५ जानेवारी रोजी आर्थिक गुन्हे शाखेकडे केली होती.
हेही वाचा: उपजिल्हा रुग्णालयांत सीटी स्कॅन बसविण्यात येणार : मंत्री राजेश टोपे
सदर प्रकरण मूर्तिजापूर शहर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले होते. आरोपींनी त्यांच्या मालकीचे प्लॉट नसताना खोटे शेतसर्वे नंबर व प्लॉट नंबर देऊन इसार पावती करून घेतली व प्लॉट खरेदी करून देतो असे सांगीतले. परंतु, गत सात महिन्यांपासून दोघेही भूलथापा देत आहेत.
त्यांच्या नावे कुठलेही प्लॉट नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे माझी फसवणूक झाली असे, गीताबाई नाईक यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी सतीश प्रभूदयाल दज्जुका व जया डिगांबर वाकोडे यांच्या विरुद्ध शहर पोलिसांत ४२० कलमासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस शहर पोलिस करीत आहेत.
Web Title: Murtijapur City Property Women Plot For Sale Financial Fraud
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..