या तालुक्यात एकाच दिवशी निघाले 20 कोरोनाबाधित

प्रा.अविनाश बेलाडकर 
Thursday, 13 August 2020

या तालुक्यात एकाच दिवशी २० जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यात एकाच कुटुंबातील पाच जणांचा समावेश असल्यामुळे खळबळ उडाली आहे. सोमवारी (ता. १०) व मंगळवारी (ता. ११) येथील इंगानप विद्यालयात आयोजित तपासणी शिबिरात अनुक्रमे १३० व ११ जणांचे स्वॕब घेण्यात आले होते.

मूर्तिजापूर (जि.अकोला)  : या तालुक्यात एकाच दिवशी २० जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यात एकाच कुटुंबातील पाच जणांचा समावेश असल्यामुळे खळबळ उडाली आहे. सोमवारी (ता. १०) व मंगळवारी (ता. ११) येथील इंगानप विद्यालयात आयोजित तपासणी शिबिरात अनुक्रमे १३० व ११ जणांचे स्वॕब घेण्यात आले होते.

त्यांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यात शहरातील १८ व प्रतीकनगर (हातगाव) आणि खिनखिनीतील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

बुधवारी (ता. १२) रात्री प्राप्त अहवालानुसार शहरातील समता नगरातील ३८ व ६३ वर्षीय पुरूष, ६१ वर्षीय महिला, स्टेशन विभागातील ३९ व ३७ वर्षीय महिला व ३६ वर्षीय पुरूष, जुन्या वस्तीतील ४१ व ४० वर्षीय पुरूष, बावनगेटवरील २३ वर्षीय पुरूष, रविदास नगरातील २३ वर्षीय पुरूष, तेलीपुऱ्यातील ३५ वर्षीय पुरूष व २३ वर्षीय महिला, मेन रोड वरील १ महिला आणि नवीन पटवारी कॉलनीतील ४९, ४५, ६५ वर्षीय महिला, १६ वर्षीय मुलगी, ४८ वर्षीय पुरूष अशा एकाच कुटुंबातील ५ जणांचा समावेश आहे. शुक्रवारी (ता.१४) इंगानप विद्यालयात सकाळी १०.३० ते दुपारी २ दरम्यान तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

या तपासणी शिबिराचा नागरिक ग्रामस्थांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात उपविभागीयअधिकारी अभयसिंह मोहिते, मुख्याधिकारी विजय लोहकरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र नेमाडे, तालुका आरोग्य आधिकारी डॉ. रामचरण राठोड यांनी केले आहे.
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Murtijapur taluka of Akola district, 20 corona affected on the same day