Akola Crime: ‘त्या’ नवजात बालिकेला मुंबईतून घेतले ताब्यात, अल्पवयीन आई सुधारगृहात; पळवून नेऊन केला होता अत्याचार

अल्पवयीन मुलीला पळवून तिच्यावर लौंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केल्यानंतर पीडितेने जन्म दिलेल्या बालिकेला पिंजर पोलिसांनी मुंबईतून ताब्यात घेतले.
Akola Crime
Akola Crime Esakal

Akola Barshitakli Abduction and Physical Assault: अल्पवयीन मुलीला पळवून तिच्यावर लौंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केल्यानंतर पीडितेने जन्म दिलेल्या बालिकेला पिंजर पोलिसांनी मुंबईतून ताब्यात घेतले. दरम्यान सध्या नवजात बालिका शिशुगृहात असून तिची अल्पवयीन आई ही सुधारगृहात आहे.

मिळालेल्या माहितीवरून बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर पोलिस स्टेशन हद्दीतील एका गावात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेल्याची तक्रार ता. १३ जुलै २०२२ रोजी पिंजर पोलिसांत देण्यात आली. फिर्यादीच्या फिर्यादीनुसार पिंजर पोलिसांनी तपास चक्रे फिरवून ता.१९ फेब्रुवारी रोजी पीडितेला पळवून नेणारा आरोपी शेख रफीक शेख शफी (वय ४१, रा. पातूर-नंदापूर जि. अकोला) याला मुंबईमधून ताब्यात घेतले.

पोलिसांनी पिडीतेला विश्‍वासात घेऊन विचारणा केली असता, आरोपी शेख रफीक शेख शफी (वय ४१) हा पीडितेच्या घरी कामानिमित्त ये-जा करीत होता. त्यावेळी आरोपीने पीडिता अज्ञान असल्याचा फायदा घेत तिला प्रेमात अडकवून तिला मालवणी, मुंबई येथे फुस लावून पळून नेले. त्याठिकाणी पीडितेला लग्नाचे अमीष दाखवून लैगिंक अत्याचार केले. (Latest Marathi News)

त्यामुळे पीडिता गर्भवती राहिली आणि एका मुलीला जन्म दिला, असे पोलिसांना सांगितले. आरोपीने नवजात बालिका ही कुठेतरी दिल्याचे सांगितल्याने नवजात बालिकेचा शोध घेणेकरिता पोलिस मुंबईला रवाना झाले. आरोपीच्या मदतीने पोलिस पथकाने नवजात बालिकेचा शोध घेतला असता, ती आठ महिन्याची नवजात बालिका मालाड, मालवणी परिसरात शेख रिझवान अब्दुल मन्नान परिवाराकडे मिळून आली.

Akola Crime
Gyanvapi Case: 'ज्ञानवापी तळघरात पूजा सुरूच राहणार', मुस्लिम पक्षाची याचिका अलाहाबाद उच्च न्यालयाने फेटाळली

पोलीस पथकाने नवजात बालिकेला ताब्यात घेवून अकोला आणले व बालकल्याण समिती समक्ष आठ महिन्यांच्या बालिकेला उत्कर्ष शिशुगृहात दाखल केले. अल्पवयीन पीडिता मुलगी सुधारगृहात आहे. पुढील तपास ठाणेदार राहुल वाघ यांचे मार्गदर्शनात पिंजर पोलिस करीत आहेत. (Latest Marathi News)

Akola Crime
Manoj Jarange : जरांगेंच्या आंदोलनामुळं पुन्हा तणाव; 'या' जिल्ह्यांमध्ये इंटरनेट आणि एसटी सेवा बंद!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com