अकोला - विदर्भात लाखो लोक विड्याचे रोज पान खातात. त्यामुळे पानाची मोठ्या प्रमाणात मागणी असून, शेतकऱ्यांना या पिकापासून चांगले उत्पन्न सुद्धा मिळू शकते. मात्र, इतर पिकांप्रमाणेच या पिकाला कोणतेही अनुदान किंवा योजनेचा लाभ नसल्याने वैदर्भीय शेतकऱ्यांनी त्याकडे पाठ फिरवली आहे.