

Akola News
esakal
अकोला: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांदरम्यान प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेऊन अतिरिक्त प्रवासी भार कमी करण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड विभागामार्फत हजूर साहिब नांदेड-आसनसोल दरम्यान उन्हाळी विशेष रेल्वेगाडी चालविण्यात येणार आहे. ही गाडी अकोला रेल्वे स्टेशनवर थांबणार असल्याने त्याचा फायदा स्थानिक प्रवाशांना मिळेल.