Akola Accident: नांदुरा, अज्ञात वाहनाच्या धडकेत वडील ठार, मुलगा किरकोळ जखमी
Fatal Road Accident in Nandura: नांदुराजवळ मोताळा रोडवरील अपघातात टाकरखेड येथील सुखलाल जाधव यांचा मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा वैभव किरकोळ जखमी झाला. अज्ञात वाहन चालकाने दुचाकीला धडक दिल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला.
नांदुरा : अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार वडीलाचा मृत्यू तर मुलगा किरकोळ जखमी झाला. ही घटना ता. १० फेब्रुवारी रोजी मोताळा रोडवर पुंडलिक महाराज महाविद्यालयाजवळ घडली.