

Courage Beyond Life: Akola’s Brave Soldier Pravin Janjal Decorated with Kirti Chakra
esakal
अकोला: जिल्ह्यातील मोरगाव भाकरे येथील रहिवासी तथा महार रेजिमेंटच्या पहिल्या बटालियन, राष्ट्रीय रायफल्सचे शिपाई प्रवीण प्रभाकर जंजाळ यांना काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरूद्ध लढताना दाखविलेल्या अद्वितीय शौर्य आणि सर्वोच्च बलिदानाबद्दल मरणोत्तर "कीर्तिचक्र" प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात आयोजित विशेष 'रक्षा अलंकरण' सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला.