महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीवर राष्ट्रवादीची चर्चा

सकाळ वृत्तसेेवा
Monday, 22 June 2020

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीसाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे शनिवारी अकोल्यात आले होते. यावेळी त्यांना घेतलेल्या आढावा बैठकीत महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकी संदर्भात कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीसाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे शनिवारी अकोल्यात आले होते. यावेळी त्यांना घेतलेल्या आढावा बैठकीत महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकी संदर्भात कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

या प्रसंगी आमदार अमोल मिटकरी, माजी आमदार हरिदास भदे, विजयराव देशमुख, ज्येष्ठ नेते श्याम अवस्थी, कार्याध्यक्ष मोहम्मद रफिक सिद्धीकी, निरिक्षक मंदाताई देशमुख, मराठा महासंघ जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे, महानगरपालिका माजी गटनेते मनोज गायकवाड, नगरसेविका, उषाताई विरक, नगरसेवक अब्दुल रहीम पेंटर, नितिन झापर्डे, माजी नगरसेवक संतोष डाबेराव, अफसर कुरेशी, बेनी पहेलवान, दिलीप देशमुख, भाऊराव सुरडकर, देवानंद ताले, लिगल सेल जिल्हा अध्यक्ष ॲड. रविकांत ठाकरे, ॲड. भिसे, मनोहरलाल मल्होत्रा, माजी नगरसेवक भुरान मंतुवाले, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस प्रदेश कार्यकारिणी सदस्य बुढण गाडेकर, माजी महिला शहर अध्यक्ष शालिनीताई येउतकर, अख्तर बेगम, लता वर्मा, लता वानखडे, रियाज खान, धर्मेंद्र शिरसाट, अल्पसंख्याक महानगर अध्यक्ष अब्दुल अजीज, महानगर संगठन सचिव पापाचंद्र पवार, माजी अल्पसंख्याक शहर अध्यक्ष हाजी काजी अतिकोद्दीन, राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे अजय मते, राहुल इंगोले, गोविंद पांडे, सलीम गन्नेवाला, चांद गौरवे, शंकर कंकाळ, आदींसह राष्ट्रवादी पक्षाचे अनेक, आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

यावेळी ना. शिंगणे यांनी नवीन लोकांना पक्षात घेऊन पक्ष बळकट करता येईल व जुन्या लोकांना समित्या व इतर ठिकाणी त्यांना योग्य तो मानसन्मान राखल्या जाईल, असे सांगितले. सध्या जिल्ह्याची स्थिती ही समाधानकारक नसून संघटन मजबूत करण्यासाठी आ. मिटकरी व मी जातीने लक्ष घालेल असेही त्यांनी सांगितले. कोरोना संकटातून जिल्हा कसा मुक्त करता येईल यावरही शिंगणे यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन बुढण गाडेकर, तर आभार प्रदर्शन देवानंद ताले यांनी केले.

 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP discusses preparations for municipal elections akola marathi news