Akola News : विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी ईडीची कारवाई; राष्ट्रवादीच्या नेत्यांचा आरोप

अकोला जिल्हा राष्ट्रवादीकडून निषेध; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
ncp leader letter to collector on ed action political leaders jayant patil politics akola
ncp leader letter to collector on ed action political leaders jayant patil politics akolasakal

अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री जयंत पाटील यांना ईडीने नोटीस बजावून चौकशीसाठी बोलाविले. या कारवाईविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभर निषेध व्यक्त केला. अकोला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसनेही ईडीच्या कारवाईचा निषेध करीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

त्यानंतर पत्रकार परिषदेत घेवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ईडीची कारवाईह विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी भाजपकडून शस्त्र म्हणून वापर केले जात असल्याचा आरोप केला.

अकोला येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांच्यास डॉ. आशाताई मिरगे, माजी आमदार प्रा. विश्वनाथ कांबळे, माजी आमदार तुकाराम बिडकर, शिवा मोहोड, पंकज गावंडे, प्रा. विजय उजवणे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. लोकशाही सक्षम करण्यासाठी विरोध पक्ष व अभिव्यक्ती स्वातंत्र आवश्यक आहे.

ncp leader letter to collector on ed action political leaders jayant patil politics akola
Akola : आपत्ती व्यवस्थापनासाठी यंत्रणांंनी समन्वय राखावा; निमा अरोरा

मात्र, बिगर भाजप शासित राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रात विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे. त्यासाठी लोकशाही मूल्यांना पायदळी तुडविल्या जात आहे. ईडी, सीबीआय, एनआयबी अशा केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग सत्ताधाऱ्यांकडून केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी केला.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी पेक्षा अधिक मोठी रक्कम घेतल्याचा आरोप केला व १३ महिने तुरुंगात ठेवले. चौकशीतून सत्त निष्पन्न झाले व त्यांना जामीन मिळाला. माजी मंत्री नवाब मलिक यांनाही तुरुगांत डांबण्यात आले. ज्येष्ठे नेते एकनाथराव खडसे यांच्या जावयाला अटक करण्यात आली. ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्या मागेही चौकशीचा ससेमिरा लावण्यात आला.

ncp leader letter to collector on ed action political leaders jayant patil politics akola
Gajanan Maharaj Palkhi : श्री गजानन महाराज शेगाव पालखी रविवारी अकोल्यात

यंत्रणांचा हा गैरवापर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांसह इतरही विरोधी पक्षातील नेत्यांबाबत केला जात असल्याचा आरोप गावंडे यांनी केला. त्याचा निषेध करीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केल्याचे गावंडे यांनी सांगितले.

विरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई - बिडकर

भाजपच्या विरोधात बोलायचे नाही. बोलात तर कारवाई होणार. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे विधिमंडळाच्या अधिवेशनात भाजपच्या विरोधात बोलले. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत आहे. या कारवाईचा सर्व स्तरातून निषेध व्हायला पाहिजे, असे मत माजी आमदार प्रा. तुकाराम बिडकर यांनी व्यक्त केले.

ncp leader letter to collector on ed action political leaders jayant patil politics akola
Akola News : दंगलीसाठी जबाबदार दोन मुख्य आरोपींना अटक

अन्य मुद्यांवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न- डॉ. आशा मिरगे

ईडीसारख्या यंत्रणांचा वापर करून विरोधी पक्षांची तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जेणे करून देशातील व राज्यातील महागाई, बेरोजकारी, कायदा व सुव्यवस्था, अन्यात, अत्याचार आदी मुद्यांवरून नागरिकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या डॉ. आशा मिरगे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com