
-प्रा. अविनाश बेलाडकर
मूर्तिजापूर (जि. अकोला) : मध्य रेल्वेच्या मुंबई-हावडा लोहमार्गावर वसलेले आणि पूर्व विदर्भातील महत्त्वाचे शहर म्हणून ओळख असलेल्या मूर्तिजापूर शहराचे रेल्वेस्थानक ‘मूर्तिजापूर जंक्शन’ असे नामाभिधान मिरविते. आता पुनर्विकास होऊन त्याचे रूप पालटले. मात्र, रेल्वे प्रशासनाच्या लेखी थांब्यासंदर्भात ते कमालीचे दुर्लक्षित आहे. मिरवायला जंक्शन असले तरी दररोज जाणाऱ्या ६५ गाड्यांपैकी केवळ नऊ गाड्या या स्थानकावर थांबतात.