
चिखली : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य असा अश्वारूढ पुतळा चिखली शहरात लवकरच उभारला जाणार असून सध्या शहराच्या मध्यवर्ती असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या जागेवर हा नवीन पुतळा उभारला जाणार आहे. त्याकरिता सध्या असलेला पुतळा काढण्याच्या कार्यवाहीला २५ जून रोजी ११ वाजता सुरुवात करण्यात आली.