सभापती निवडणुकीविरोधात पुढील सुनावणी ३० नोव्हेंबरला | Akola | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सभापती निवडणुकी विरोधात पुढील सुनावणी ३० नोव्हेंबरला

अकोला : सभापती निवडणुकी विरोधात पुढील सुनावणी ३० नोव्हेंबरला

अकोला : जिल्हा परिषदेत २९ ऑक्टोबर रोजी दाेन सभापती पदासाठी झालेल्या विशेष सभेविरोधात अपक्ष सदस्य निता गवई यांनी विभागीय आयुक्त अमरावती यांच्याकडे याचिका दाखल केली आहे. त्यामुळे या प्रकरणी विभागीय आयुक्तांनी १६ नाेव्हेंबर राेजी सुनावणी ठेवली होती. परंतु अमरावती येथे संचारबंदी लागू करण्यात आल्यामुळे सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे आता या प्रकरणी पुढील सुनावणी ३० नोव्हेंबर रोजी होणार आहे.

जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या दाेन सभापतिपदाच्या निवडणुकीत वंचितचा पराभव करीत महाविकास आघाडीने बाजी मारली हाेती. महिला बाल कल्याण सभापतीच्या निवडणुकीत स्फूर्ती गावंडे तर, विषय समिती सभपतिपदासाठी सम्राट डाेंगरदिवे यांची अविराेध निवड झाली हाेती.

दरम्यान निवडणूक प्रक्रिया झालेल्या विशेष सभेला अपक्ष सदस्या नीता गवई यांनी विभागीय आयुक्तांकडे आव्हान दिले आहे. त्यामुळे विभागीय आयुक्त अमरावती यांनी जिल्हाधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन, महिला व बाल कल्याण सभापती स्फूर्ती गावंडे, सभापती सम्राट डाेंगरदिवे यांना सुनावणीसाठी हजर राहण्याकरिता नाेटीस बजावली होती.

सभापती निवडणुकीसाठी झालेली विशेष सभाच बेकायदेशीर असल्याचा दावा याचिकाकर्त्या तथा सदस्या नीता गवई यांनी केला आहे. दरम्यान या प्रकरणी १६ नोव्हेंबर रोजी सुनावणी ठेवली होती. परंतु अमरावतीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आल्यामुळे या प्रकरणाची पुढील सुनावणी ३० नोव्हेंबर रोजी होणार आहे.

टॅग्स :Akolaelection