नऊ जणांचा बळी घेणाऱ्यांची होणार चौकशी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

akoal

अकोला : नऊ जणांचा बळी घेणाऱ्यांची होणार चौकशी

अकोला : अकोट-शेगाव मार्गावरील रौंदळा-देवरी दरम्यानचा पाचशी मीटरचा रस्ता खोदून ठेवण्यात आला. महामार्ग निगम व उपप्रादेशिक वन विभागाच्या निष्काळजीपणामुळे ५०० मीटरचे बांधकाम अर्धवट राहिले. परिणामी आतापर्यंत या रस्त्याने नऊ निष्पाप वाहनचालकांचे बळी घेतले आहे. त्यांच्याविरुद्ध पोलिस कारवाई करून गुन्हे दाखल करण्याची मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी पोलिस अधीक्षकांकडे केली. त्यानुसार पोलिस अधीक्षकांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचा आदेश स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षकांना दिला आहे.

हेही वाचा: जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शासकीय पूजन

अकोट-देवरी- शेगाव रस्ता महामार्ग विकास प्राधिकरणांतर्गत बांधला जात आहे. रस्त्याचे बहुतांश बांधकाम पूर्ण झाले असून, पाटसुल शिवारातील वनक्षेत्राच्या येत असलेल्या रौंदळा-देवरी दरम्यान पाचशे मीटरचा रस्ता खोदून ठेवला आहे. कोणतीही बांधकामे नसताना वर्दळीच्या रस्त्यावर जाणून-बुजून महाराष्ट्र महामार्ग निगम आणि उपप्रादेशिक वन विभाग अधिकाऱ्यांनी हेतूपुरस्सर निष्काळजीपणाने या रस्त्याचा बांधकाम ५०० मीटरचे बांधकाम अर्धवट सोडल्यामुळे नऊ निष्पाप लोकांचे बळी गेले आहे. बांधकाम नियमाचे अवलोकन केले असता जुना ३० फुटाचा रस्ता बांधण्यासाठी कोणत्या विभागाची परवानगी घेणे आवश्यक नाही.

हेही वाचा: ST Worker : नागपूर वर्धमान नगर आगारातील २३ कर्मचारी बडतर्फ

ता.२९ डिसेंबर २०२१ रोजी जिल्हा नियोजन बैठकीत पालकमंत्र्यांच्या समोर या रस्त्याविषयी संबंधित विभागाकडे आमदार रणधीर सावरकर यांनी विचारणा केली होती. त्यानंतरही कारवाई झाली नाही. त्यामुळे भांदवी कलम ३०४, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी मंगळवारी जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्याकडे केली. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी योग्य ती कारवाई करून एलसीबीकडे या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. आमदार रणधीर सावरकर यांच्यासमवेत जिल्हा भाजप सचिव माधव मानकर , गिरीश जोशी, प्रवीण डिक्कर, ॲड. देवाशीष काकड, मंगेश चिखले, कनक कोटक, राजेश चंदन, नितीन जोशी, अक्षय जोशी आदी यावेळी उपस्थित होते.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Akolaattempt to killed
loading image
go to top