ST Worker Strike | वर्धमान नगर एसटी आगारातील २३ कर्मचारी बडतर्फ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ST Worker
नागपूर वर्धमान नगर आगारातील २३ कर्मचारी बडतर्फ

ST Worker : नागपूर वर्धमान नगर आगारातील २३ कर्मचारी बडतर्फ

नागपूर : राज्य पातळीवर विविध बैठका घेऊनही संपावर तोडगा निघत नसल्याने सरकार व एसटी प्रशासन(Government And ST Administration) हतबल झाले आहे. विलीनीकरणा शिवाय मागे हटणार नाही, अशी भूमिका कर्मचाऱ्यांची असल्याने बरेच कर्मचारी अद्यापही संपावर(Strike) ठाम आहे. त्यामुळे प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या काही दिवसांपासून कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. याच अनुषंगाने मंगळवारी प्रशासनाने वर्धमान नगरच्या एकाच आगारातून तब्बल २३ कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे. (ST Worker Strike)

हेही वाचा: जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शासकीय पूजन

वर्धमान नगर आगारातून बडतर्फ करण्यात आलेल्यांमध्ये चालक ७, वाहक १२ आणि यांत्रिक ४ अशा एकूण २३ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. नागपूर विभागातून आता पर्यंत एकूण १०९ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. यामध्ये चालक ४४, वाहक ४९ चालक तथा वाहक ३ आणि यांत्रिक १३ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. विभागातील संपकर्त्यांपैकी ४३५ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

२१ डिसेंबर पासून आतापर्यंत केवळ ७० संपकरी कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. यात चालक २५, वाहक २५, चालक कम वाहक ८, यांत्रिक ७, लिपिक १, वाहतूक नियंत्रक २, वरिष्ठ लिपिक १, स्वच्छक १ असे एकूण ७० कर्मचारी या २१ दिवसात कामावर रुजू झाले आहेत.

हेही वाचा: Corona Update : नांदेडला मंगळवारी १७० बाधित

कामावर रुजू होण्याचा कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद अत्यल्प असल्याने प्रशासन कठोर भूमिका घेत आहेत. त्यामुळे बडतर्फीची कारवाई प्रशासनाकडून दिवसागणिक वाढत असताना सुद्धा कर्मचारी मात्र संपावर कायम आहेत. विलीनीकरणा शिवाय माघार घेणार नसल्याची भूमिका कर्मचाऱ्यांची असल्याने संपावर ते अद्यापही कायम आहेत.

३७ बसनी दिले ३ लाखाचे उत्पन्न

नागपूर विभागातून एकूण ३७ बसनी ९४ फेऱ्या केल्या. त्यातून एसटीला ३ लाख ३ हजार ३३ रुपयांचे उत्पन्न मिळाले. गणेशपेठ १३, इमामवाडा ५, घाटरोड ७, उमरेड ३, सावनेर ४, वर्धमान नगर ३, काटोल १ आणि रामटेक १ या आगारातून एकूण ३७ बस धावल्या. यातून ३ हजार २१८ प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती विभागीय नियंत्रक नीलेश बेलसरे यांनी दिली.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top