esakal | यंदाची धुईमाती बी मातीत जाईन काहो बा? कोरोनाच्या निर्बंधांमुळे तरुणांचा हिरमोड तर रंग विक्रेते संकटात
sakal

बोलून बातमी शोधा

The non sale of Rangpanchami colors has raised concerns among traders

यावर्षीही ऐन रंगपंचमीचा सण जवळ येत असतानाच कोरोनाने डोकेवर काढल्याने तरुणाईचा हिरमोड होताना दिसत आहे, तर व्यावसायिकांच्या चेहऱ्यावरील चिंता वाढली आहे. 

यंदाची धुईमाती बी मातीत जाईन काहो बा? कोरोनाच्या निर्बंधांमुळे तरुणांचा हिरमोड तर रंग विक्रेते संकटात

sakal_logo
By
धीरज बजाज

हिवरखेड (अकोला) : विविध रंगांच्या माध्यमातून आनंदाची उधळण करण्याचा सण म्हणजे धुलीवंदन रंगोत्सव असतो. वऱ्हाडात ‘धुईमाती’ ला विशेष महत्त्व आहे. परंपरागत पद्धतीने दरवर्षी होळीच्या दुसऱ्या दिवशी धुईमाती हा सण साजरा केला जातो. सतत पाच दिवसांपर्यंत सुद्धा हा सण साजरा करण्याची बऱ्याच ठिकाणी परंपरा असल्याने या सणाला रंगपंचमी सुद्धा म्हणतात. मात्र, गतवर्षीपासून कोरोना विषाणू संसर्गाने रंगपंचमीचे रंगच बेरंग झाले आहेत. यावर्षीही ऐन रंगपंचमीचा सण जवळ येत असतानाच कोरोनाने डोके वर काढल्याने तरुणाईचा हिरमोड होताना दिसत आहे, तर व्यावसायिकांच्या चेहऱ्यावरील चिंता वाढली आहे. 

बार्शीटाकळीत ‘वैध’ धंद्यांना लाकडाऊन; ‘अवैध धंदे खुलेआम ! 

कठोर निर्बंध शिथिल करावे ! 

कोरोनाच्या नावाखाली अवास्तव निर्बंध लादून एका वर्षात अनेक सण उत्सव तसेच गेले आता यंदाची धुईमाती मातीतच जाईल काय? असा प्रश्न वऱ्हाडकरांना पडला असून, आधीच वर्षभरापासून तणावात असणाऱ्या सर्वसामान्यांना वेठीस धरण्यात येऊ नये आणि त्यांना प्रशासनाने ‘बुरा न मानो होली है’ असे तत्व स्वीकारून हा आनंदोत्सव रंगोत्सव मनसोक्तपणे साजरा करू द्यावा. जेणेकरून त्यांचे मनोबल वाढून त्यांना कोरोनाशी लढण्याचे बळ मिळेल, अशी मागणी सर्वसामान्य जनता करीत आहेत. 

ऐन हंगामात महावितरणचा शेतकऱ्यांना शॉक;  कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडित करायला सुरुवात

विक्रेत्यांमध्ये संभ्रमाची स्थिती 

लॉकडाउन बाबत शासनाचे नियम वारंवार बदलत असल्यामुळे याचा फटका विक्रेत्यांना बसतो. सिझनेबल वस्तूंवर याचा विशेष परिणाम होतो. जर भरपूर साठा बोलावून ठेवला आणि वेळेवर निर्बंध लादले तर पूर्ण गुंतवणूक वाया जाते. याउलट निर्बंधाच्या भीतीने माल आणला नाही व वेळेवर निर्बंध हटविले तर उत्पन्नाची चांगली संधी हातून चालली जाते. अशी व्यथा अनेक किरकोळ विक्रेत्यांनी बोलून दाखविली. 

कोरोनामुळे व्यवसायांवर प्रतिकूल परिणाम झाला असून, धुलीवंदनासाठी शासनाने किरकोळ विक्रेत्यांच्या रोजगारावर परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी व विना निर्बंध सण पार पडू द्यावेत. 
- पंकज अग्रवाल, किरकोळ रंग विक्रेते, हिवरखेड, ता. तेल्हारा

loading image