ऐका हो ऐका...सहकारी संस्था करणार आता कृषी निविष्ठांची विक्री

अनुप ताले
Thursday, 11 June 2020

जिल्ह्यात अल्प प्रमाणात तालुका खरेदी-विक्री संघाकडून कृषी निविष्ठांची विक्री होते. परंतु, खासगी विक्रेत्यांकडूनच रासायनिक खते, कीटकनाशके व बी-बियाण्यांची प्रामुख्याने विक्री केली जाते. शेतकऱ्यांना सहकारी बँका किंवा राष्ट्रीय बँकांमधून दिलेले पीक कर्जातून शेतकरी, व्यापाऱ्यांच्या मार्फत रासायनिक खते, कीटकनाशके व बी-बियाणे खरेदी करतात. शेतकऱ्यांनी या कृषी निविष्ठा विविध कार्यकारी सहकारी संस्था किंवा शेतकरी उत्पादक कंपनीमधून घेतल्यास, या सहकारी संस्था आर्थिक दृष्ट्या सक्षम होतील. त्या अनुषंगाने ग्रामीण भागांमध्ये रासायनिक खते, कीटकनाशके व बी-बियाणे विक्रीचे सर्विस सेंटर सुरू करण्यात येणार आहे.

अकोला : शेतकऱ्यांचे हीत जोपासण्यासोबतच सहकारी संस्थाही आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हाव्यात, या उद्देशाने जिल्ह्यातील विविध कार्यकारी सहकारी संस्था व शेतकरी उत्पादक कंपन्याद्वारे आता कृषी निविष्ठांची विक्री केली जाणार आहे. त्यासाठी ग्रामीण भागांमध्ये रासायनिक खते, कीटकनाशके व बी-बियाणे विक्रीचे सर्विस सेंटर सुरू करण्यात येणार आहे.

 

जिल्ह्यात अल्प प्रमाणात तालुका खरेदी-विक्री संघाकडून कृषी निविष्ठांची विक्री होते. परंतु, खासगी विक्रेत्यांकडूनच रासायनिक खते, कीटकनाशके व बी-बियाण्यांची प्रामुख्याने विक्री केली जाते. शेतकऱ्यांना सहकारी बँका किंवा राष्ट्रीय बँकांमधून दिलेले पीक कर्जातून शेतकरी, व्यापाऱ्यांच्या मार्फत रासायनिक खते, कीटकनाशके व बी-बियाणे खरेदी करतात. शेतकऱ्यांनी या कृषी निविष्ठा विविध कार्यकारी सहकारी संस्था किंवा शेतकरी उत्पादक कंपनीमधून घेतल्यास, या सहकारी संस्था आर्थिक दृष्ट्या सक्षम होतील. त्यामुळे शेतकऱ्यांना कार्यकारी सहकारी संस्थांमधून किंवा शेतकरी उत्पादक कंपनीमधून घेण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) डॉ. प्रवीण लोखंडे यांनी सर्व तालुका खरेदी विक्री संघ, कार्यकारी सेवा सहकारी संस्था, सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थांचे अध्यक्ष, व्यवस्थापक, सचिव यांना सूचित केले आहे.

 

हे ही वाचा : बळीराजा जरा धीरानं ...जमीन भिजली की होऊ दे पेरणी जोमानं

 

सहकारी संस्था आर्थिक दृष्ट्या सक्षम होतील
विविध कार्यकारी सहकारी संस्था किंवा शेतकरी उत्पादक कंपन्यांमधून शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा घेण्यासाठी प्रोत्साहीत केल्यास, संबंधित सहकारी संस्था आर्थिक दृष्ट्या सक्षम होतील. त्या अनुषंगाने महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ यांचे मार्फत पीएसीएस किंवा शेतकरी उत्पादक कंपन्या असणाऱ्या ग्रामीण भागामध्ये रासायनिक खते, कीटकनाशके व बी-बियाणे विक्रीचे सर्विस सेंटर सुरू करण्यात येणार आहे.
- डॉ.प्रवीण लोखंडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अकोला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now Co-operative societies will sell agricultural inputs