Akola News: १४ हजार लाभार्थ्यांकडून धान्याची उचल नाही; तीन महिन्यांचे वाटप, तीन लाख १६ हजार लाभार्थ्यांकडून धान्य उचल
Ration Distribution: अकोला जिल्ह्यात जून ते ऑगस्ट या कालावधीतील मोफत धान्य वाटप सुरू असूनही १४ हजारांहून अधिक लाभार्थ्यांनी अद्याप उचल केली नाही. पुरवठा विभागाने लवकरात लवकर धान्य घेण्याचे आवाहन केले आहे.
अकोला : पावसाळा व प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यांचे धान्य वाटप अंत्योदय व प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारकांना एकत्रित करण्याचा निर्णय पुरवठा विभागाने घेतला होता.