Scheduled Caste Scholarships : शिष्यवृत्तीचे अडीच हजार अर्ज प्रलंबित; प्रलंबित अर्ज निकाली काढण्याच्या महाविद्यालयांना सूचना
Education Support : अकोला जिल्ह्यात अनुसूचित जातीतील अडीच हजारांवर शिष्यवृत्ती अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत. समाजकल्याण सहायक आयुक्त डॉ. अनीता राठोड यांनी महाविद्यालयांना तातडीने हे अर्ज निकाली काढण्याचे आदेश दिले आहेत.
अकोला : अनुसूचित जाती प्रवर्गातील अडीच हजारांवर विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असून, ते महाविद्यालयांनी तातडीने निकाली काढावे, अशी सूचना समाजकल्याण सहायक आयुक्त डॉ. अनीता राठोड यांनी केली आहे.