esakal | पॉझिटिव्ह थिंकिंगने कोरोनावर करा मात
sakal

बोलून बातमी शोधा

Overcome Corona with Akola Buldana News Positive Thinking

कोरोनाच्या साथीने धुमाकूळ घातला आहे, पण पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवल्यास या आजारावर सहजपणे मात करता येते. मी कोरोनाला हरवले आहे. बाधित रुग्णांची भीती न बाळगता मनोबल वाढवावे. वयस्कर व्यक्तींना आहार व वेळेत उपचार मिळाले तर त्यांचाही कोरोना बरा होऊ शकतो, असा विश्वास सिंदखेड राजा पोलिस स्टेशनचे कर्मचारी विलास काकड यांनी ‘सकाळ’सोबत बोलताना व्यक्त केले.

पॉझिटिव्ह थिंकिंगने कोरोनावर करा मात

sakal_logo
By
गजानन काळुसे

सिंदखेडराजा (जि.बुलडाणा) : कोरोनाच्या साथीने धुमाकूळ घातला आहे, पण पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवल्यास या आजारावर सहजपणे मात करता येते. मी कोरोनाला हरवले आहे. बाधित रुग्णांची भीती न बाळगता मनोबल वाढवावे.

वयस्कर व्यक्तींना आहार व वेळेत उपचार मिळाले तर त्यांचाही कोरोना बरा होऊ शकतो, असा विश्वास सिंदखेड राजा पोलिस स्टेशनचे कर्मचारी विलास काकड यांनी ‘सकाळ’सोबत बोलताना व्यक्त केले.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

सिंदखेड राजा पोलिस स्टेशन येथे कार्यरत काकड यांची ड्युटी मराठवाडा-विदर्भाच्या चेक पोस्टवर होती. त्यामुळे नेहमी नागरिकांच्या संपर्कामध्ये यावे लागत होते. काही दिवस आगोदर ताप आल्यामुळे डॉक्टरच्या सल्ल्यानुसार उपचार घेतले. त्यामुळे ताप कमी झाला, परंतु आपल्यापासून समाजाला व सोबत असणाऱ्या पोलिस विभागाच्या कर्मचाऱ्यांना संसर्ग होणार नाही, यासाठी सिंदखेड राजा येथील कोरोना सेंटरला जाऊन स्वतः कोरोनाची टेस्ट करून घेतली; ता. १३ ऑगस्ट रोजी कोरोना टेस्ट पॉझिटिव आली.

त्यामुळे लगेच वरिष्ठांना याची माहिती दिली व स्वतः सिंदखेड राजा येथील कोविंड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल झालो. त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष दराडे व त्यांच्या सहकारी डॉक्टरांनी सांगितलेल्या सूचनांचे काटेकोर पालन केले.

सकस आहारा सोबतच थोडा व्यायाम आणि सकारात्मक विचारसरणी त्रिसूत्री मला कोरोना मुक्त होण्यात महत्त्वाची ठरली. कठीण काळात पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवले सर्वांनी प्रोत्साहित केले, असे काकड यांनी सांगितले.

पोलिस विभागातील वरिष्ठांनी वाढविले मनोबल
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील, अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, उपविभागीय पोलिस अधिकारी भीमानंद नलावडे, सिंदखेड राजा ठाणेदार जयवंत सातव, पोलिस उपनिरीक्षक राम पारवे, शैलेश जाधव, सूरज काळे व पोलिस स्टेशनचे सहकारी पोलिस कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी भ्रमणध्वनीच्या माध्यमातून संपर्क करून मनोबळ वाढवण्याचे काम केले. त्यामुळे स्वतःच्या मनामध्ये कधीच नकारात्मक विचार आणले नाही त्यामुळे मी कोरोना सारख्या रोगावर मात करू शकलो.
(संपादन - विवेक मेतकर)

loading image
go to top