esakal | खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सीजनच्या खाटा मिळेनात

बोलून बातमी शोधा

खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सीजनच्या खाटा मिळेनात
खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सीजनच्या खाटा मिळेनात
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः जिल्ह्यात खासगी रूग्णालयांमध्ये ऑक्सीजनचे बेड जवळपास फुल्ल झाले आहेत. शासकीय रुग्णालयांमध्येच गुरुवारी (ता. २३) ऑक्सीजनच्या खाटा रिक्त असल्याची माहिती प्रशासनाने दिली. त्यामुळे कोरोनाग्रस्तांसह त्यांच्या नातेवाईकांचे टेंशन वाढले आहे.

कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड-१९ रोगाने जिल्ह्यात मार्च, एप्रिल २०२० पासून धुमाकूळ घातला आहे. सुरुवातीच्या काळात महानगरात थैमान घालणाऱ्या कोरोनाचा नंतर गाव, खेड्यात सुद्धा प्रादुर्भाव वाढला.

सप्टेंबर महिन्यात तर कोरोनाग्रस्तांच्या संख्येने उच्चांकी गाठली होती. या महिन्यात नव्याने आढळणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या दोन हजारावर पोहचली होती. दरम्यान आता जिल्ह्यात पुन्हा कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे रुग्णांना ऑक्सीजनच्या खाटा मिळणे सुद्धा दुरापास्त झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

--------------

अशी आहे स्थिती

- शासकीय वैद्यकीय महाविद्यालयत २६, आरकेटी येथे १६, जिल्हा स्त्री रूग्णालयात २४ तर शासकीय रूग्णालय मूर्तिजापूर येथे ३ ऑक्सीजनच्या खाटा रिक्त आहेत.

- खासगीतील अवघते हॉस्पीटलमध्ये चार, देवसार होस्टेलमध्ये ७, ठाकरे हॉस्पिटलमध्ये ५, नवजीवन हॉस्पीटलमध्ये ६, इंदिरा हॉस्पीटलमध्ये ४, देशमुख हॉस्पिटलमध्ये एक तर फातेमा हॉस्पिटलमध्ये सहाच ऑक्सीजनच्या खाटा रिक्त आहे.

संपादन - विवेक मेतकर