वंचितला दुसरा मोठा झटका; पांडे गुरुजींनी हातात घेतले कमळ

Pandey Guruji joins BJP
Pandey Guruji joins BJPPandey Guruji joins BJP

अकोला : वंचित बहुजन आघाडीचे (vanchit bahujan aaghadi) पदाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण बांधकाम समिती सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी शनिवारी दुपारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश (Pandey Guruji joins BJP) केला.

सरपंच ते सलग चार वेळा जिल्हा परिषद सदस्यपदी निवडून आलेले माजी जिल्हा परिषद बांधकाम आणि शिक्षण समिती सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी वंचितला (vanchit bahujan aaghadi) सोडचिठ्ठी देऊन हातामध्ये कमळ घेतला आहे. वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी पांडे गुरुजी (Pandey Guruji) शिवसेनेमध्ये होते. यावेळी त्यांनी उपजिल्हाप्रमुखपद सुद्धा भूषविले होते.

Pandey Guruji joins BJP
‘राज्य सरकारने तीन महिन्यांत डेटा देणार असल्याचे म्हटले’

शिवसेनेतीलअंतर्गत वादामुळे त्यांनी धनुष्यबाण सोडत तीन वर्षांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचा हात थांबला होता. वंचितकडून त्यांना पहिल्यांदाच जिल्हा परिषद सभापतीचे पदही मिळाले होते. मात्र, ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द झाले होते. भविष्याच्या राजकारणाचा विचार करीत भाजपमध्ये (BJP) प्रवेश केल्याचे पांडे गुरुजी (Pandey Guruji) यांनी यावेळी सांगितले.

वंचितला दुसरा मोठा झटका

पांडे गुरुजी पूर्वी विधानसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीमधून माजी आमदार हरिदास भदे आणि माजी आमदार बळीराम सिरस्कार सुद्धा बाहेर पडले होते. आता सदर दोन्ही नेते हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. त्यानंतर पांडे गुरुजी (Pandey Guruji) यांनी वंचितला (vanchit bahujan aaghadi) सोडचिठ्ठी दिल्याने त्याचा फटका पक्षाला बसणार असल्याची शक्यता राजकीय जाणकारांनी व्यक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com